∆बार्शीटाकळी शहरासह तालुक्यात पोळा साजरा ∆बदलत्या काळासोबत थोडासा आणि येणाऱ्या बैलजोड्या साल दर साल कमी - कमी होत आहेत ∆महागाव येथे चोक पोलीस बंदोबस्त कोणताही अनुचित प्रकार घडला नाही
∆बार्शीटाकळी शहर असेल तालुक्यात पोळा साजरा
∆बदलत्या काळासोबत थोडासा आणि येणाऱ्या बैलजोड्या साल दर साल कमी - कमी होत आहेत
∆महागाव येथे चोक पोलीस बंदोबस्त कोणताही अनुचित प्रकार घडला नाही
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी शहरासह तालुक्यात बैलपोळा सण , शेतकरी वर्ग दरवर्षी मोठ्या आनंदाने साजरा करत असतात विदर्भातील शेतकरी या सणाला खूप महत्त्व देतात बैल शेतीच्या कामात खूप मदत करतात आज-काल शेतीसाठी ट्रॅक्टर वापरतात पण पुरातन काळापासून शेतीची अवघड कामे जसे की पेरणी नांगरणी वखरणी बैलाच्या साहाय्याने केली जात असेल पूर्वीच्या कडील मोटर गड्या नव्हत्या तेव्हा दूरच्या गावी तालुक्याच्या ठिकाणी जायचे असेल तर बैलगाडीचा उपयोग होत होता अगदी नव्याने लग्न झालेल्या जोडप्यांची वरात सुद्धा बैलगाडी मधूनच काढली जात असेल या काळात शेतकऱ्यांच्या आयुष्य खूप जडून होता त्यांचे आभार मानण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो . बार्शीटाकळी शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहाने पोळा सण साजरा करण्यात आला स्थानिक वंजारी पुरा येथील श्री नामदेवराव भडांगे यांच्या मानाचे असलेल्या बैल जोडी माळीपुरा, गवारीपुरा , सोमवार पेठ , गजानन नगर , इंदिरा आवास , ढोरे वेटाळ लबडे वेताळ व काळा मारुती चौकातील मानाच्या बैल जोडायचे गजरात शहरातील प्रमुख मार्गावरून पुरातन अकोला वेशीजवळ पोहोचल्या तेथे उपस्थित हजारो नागरिकांच्या उपस्थितीत महादेवाच्या झडत्यानंतर पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी स्वर्गीय सदाशिव सांगळे यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला तसेच बैलजोडी मालकांचा सत्कार करण्यात आला हा उत्सव उत्साहाने पार पडण्यासाठी दिनेश रत्नपारखी, श्रीकृष्ण आखरे , संतोष कुरळे, लक्ष्मण सांगळे यांनी आता परिश्रम घेतले पोलीस निरीक्षक बार्शिटाकळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोक बंदोबस्त ठेवला होता
Comments
Post a Comment