वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने सांत्वन पर भेट

*वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी तालुक्याच्या वतीने सांत्वन पर भेट*
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी 
 बार्शीटाकळी तालुक्यातील जमकेश्वर येथे विकी वसंता कोकरे रा.जमकेश्वर वय 22वर्ष यांची गावातीलच प्रवासी निवारा मध्ये फोनवर बोलत असताना अंगावर स्लॅब कोसळून मृत्यू झाला मयत विक्की वसंता कोकरे यांच्या घरी जाऊन त्याचे आई वडील मोठा भाऊ यांची वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन सांत्वन केले. व शासनाच्या वतीने योग्य तो पाठपुरवठा करून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडी चे बार्शिटाकळी तालुका अध्यक्ष रतन आडे, तालुका महासचिव अजय अरखराव, पंचायत समिती सभापती प्रकाशजी वाहुरवाघ साहेब, पंचायत समिती सदस्य रोहिदास राठोड, पंचायत समिती सदस्य दादाराव पवार, वंचित बहुजन आघाडी चे तालुका प्रसिद्धीप्रमुख मिलिंद करवते, माजी पिंजर सर्कल अध्यक्ष श्रीकृष्ण भगत,त्याचप्रमाणे गावातील काही प्रतिष्ठित नागरिक शेख समद, पांडुरंग खरतडे, पद्माकर उरकडे, अमोल देशमुख, सलीम खान, नासिर खान, बिस्मिल्ला खान आदी मंडळी उपस्थित होती

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे