जी एन ए महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजराविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मैदानी खेळ आवश्यक. रवींद्र भाटकर

जी एन ए महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मैदानी खेळ आवश्यक. रवींद्र भाटकर 
बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी 

      स्थानिक गुलाम नवी आजाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शी टाकळी 
येथे आयोजित मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाद्वारे विविध स्पर्धांचे आयोजन क्रीडा दिनाच्या आयोजित या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अधीक्षक नंद कुमार राऊत ,डॉक्टर वैशाली कौटुंबे ,यांनी क्रीडा स्पर्धाचे महत्व विशद केले .डॉक्टर मोहन बल्लाळ यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तर अध्यक्षीय भाषणात रवींद्र भटकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मैदानी खेळाचे महत्व विशद केले यात आयोजित धावण्याच्या स्पर्धेत रुपेश कांबळे पहिला ,विकी राठोड दुसरा ,मोहन बागडे तिसरा ,तर लिंबू चमचा स्पर्धेत सुप्रिया गवई पहिली ,गायत्री राठोड दुसरी ,पल्लवी राठोड तिसरी ,क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले मनोरंजन या स्पर्धा प्रकारात श्री शिवाजी संघ प्रथम, तर श्री संभाजी संघ द्वितीय ,क्रमांक राहिला कार्यक्रमाच्या आयोजनात डॉक्टर तारेश आगाशे ,डॉक्टर मनोज कुमार देशपांडे, डॉक्टर अनिल दडमल, डॉक्टर बिस्मिल्ला खान ,डॉक्टर देवानंद मोहोळ ,प्राध्यापक किशोर आडोळे ,प्राध्यापक मंगला बोराडे मॅडम, प्राध्यापक वैशाली सोनवणे ,प्राध्यापक वैभव धात्रक, यांनी स्पर्धेचे परीक्षण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण विभाग संचालक डॉक्टर तारेश आगाशे तर आभार प्रदर्शन डॉक्टर मनोज कुमार देशपांडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम केले. 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे