भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शहीद वीर भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले..,

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने  शहीद वीर भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले..,

आज दि. 28/9/2022 रोजी बार्शिटाकळी येथे धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त बार्शीटाकळी तालुक्याचे नियोजन काय आहे, त्याबद्दल मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यासंदर्भात मिटींगचे आयोजन करण्यात आले होते. त्याच प्रमाणे शहीद वीर भगतसिंग यांची जयंती सुद्धा साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्ह्याच्या वतीने शहीद वीर भगतसिंग यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले यानंतर मान्यवरांनी आप आपले मनोगत व्यक्त करताना भारतीय बौद्ध महासभा बार्शीटाकळी तालुक्याचे महासचिव म्हणाले दिनांक सहा ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रम अकोला जिल्ह्याचे वतीने राबविण्यात येत आहेत त्यात आपली उपस्थिती असणे अत्यंत गरज आहे त्यात आपण भाग घेतला पाहिजे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या जाहीर सभेला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा एडवोकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भरपूर प्रमाणात कार्यकर्ते महिला व सामान्य नागरिक उपस्थित होतात पोलिस प्रशासनाच्या देखील आपल्याला महत्त्वाचे योगदान असते ते त्यांचं काम अगदी चोखपणे पार पाडतात. तरी आपलं बौद्ध समाजातील युवापिढीचा आज कर्तव्य आहे त्यांनी समता सैनिक दल मध्ये येऊन आपणही जनतेच्या संरक्षणासाठी योगदान दिले पाहिजे हे महत्त्वाची बाब तालुक्याचे महासचिव शशिकांत इंगळे यांनी सांगितली. त्यानंतर अध्यक्षीय भाषणात भारतीय बौद्ध महासभेचे बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष प्रवीण भाऊ वानखडे यांनी सांगितले धम्मचक्र प्रवर्तन दिनाची सभाही एका बौद्ध समाजाची नसून ही या महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी बांधवांची सुद्धा आहे. यात ओबीसी बांधवांसाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आजपर्यंत काय केले, आणि यापुढे सुद्धा करतच राहतील हा मेसेज घराघरात पोहोचला पाहिजे आज अकोला जिल्ह्यातील सर्वच गावातून वेगवेगळे पथक या कार्यक्रमात सहभागी झाले पाहिजे यामध्ये लेझीम पथक आखाडा पथक त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सुद्धा आणले पाहिजे. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त संख्येेने लोक  या सभेला कशी आणायची याचा आपण नियोजन केले पाहिजे. आणि हे काम आपण सर्व कार्यकर्त्यांच आहे असे ते म्हणाले यावेळी उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे किरण पळसपगार जिल्हा संघटक भारतीय बौद्ध महासभा अकोला, हेमंत गणवीर, प्रचार प्रसार सचिव, बाबुलाल ईगळे महानगर संघटक, सुखदेव दंदी धम्म मित्र, नाईक सर, संकेत वानखडे , भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष प्रवीण वानखडे, भारतीय  बौध्द.महासभा बार्शीटाकळी तालुका महासचिव शशिकांत इंगळे, वंचित बहुजन युवक आघाडी तालुका अध्यक्ष अमोल जामनिक, नगरसेवक श्रावण भातखडे, पंचायत समिती सदस्य रोहीदास राठोड,  वंचित बहुजन आघाडी तालुका प्रसिद्धी प्रमुख मिलिंद करवते, ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल भाऊ खंडारे, सोनगीरीचे सरपंच जामनीक भाऊ,  भूषण सरकटे, सनी धुरंधर, रक्षक जाधव, आदी कार्यकर्ते उपस्थित होते . 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे