रिफा फाउंडेशन च्या वतीने नीट परीक्षा मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाचा सत्कार
*रिफा फाउंडेशन च्या वतीने नीट परीक्षा मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाचा सत्कार*
प्रतिनिधी बार्शी टाकली
रिफा फाउंडेशन गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहे सदर उद्देशाला समोर ठेवून फाउंडेशनच्या वतीने रेड क्रॉस सोसायटी मध्ये एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सन 2022 23 मध्ये नीट परीक्षा मध्ये यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाची सुरुवात नाईम गोहर यांनी तीलावत ए कलाम पाक पठन करून केले या नंतर अनस नबील यांनी नाते पाक पठन केले तसेच रिफा फौंडेशन चे अध्येक्ष नाईम फराज यांनी प्रास्ताविक केले या वेळी अकोला शहरातील सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती ज्यांच्या हस्ते नीट परीक्षा मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ संपन्न झाले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बॉण्ड इन्स्टिट्यूट चे साबीर अली सर ब्राईट इन्स्टिट्यूट चे हरणीत सिंग सर ब्रिलियंट इन्स्टिट्यूट चे सजाद अहमद खान यांनी अकरावी व बारावी मध्ये शिकत असलेल्या तसेच नीट परीक्षेचे अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यानंतर विद्यार्थ्यांसाठी बारावीनंतर काय केरियार गाईडन्स चे सेसशन घेण्यात आले यावेळी वंदना खंडेलवाल आदिना सहेर शेखर बांडे, आकीब शेख जावेरीया खान इंजिला सय्यद
अलफिया अमरुज तलहा अहमद जुबेर शेख अबुजर शेख सीमा फिरदोस फरदिन अहेमद उमेर खान मुफ्रेहा महेक अरबाज बागवान , ऋतुजा कुकडे , समृद्धी हातवळणे , सायली तायडे , ऐश्वर्या नायर , शुभम नरोटे, असरा इमान आदि विद्यार्थ्यांना यावेळी नीट मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी रिफा फाउंडेशनचे सचिव अमीन लोधी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले तसेच सूत्रसंचालन डॉक्टर मोहसीन व अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाची राजू कुरेशी यांनी केले कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी रिफा फाउंडेशनची उपाध्यक्ष शगुफ्ता जमाल यांनी व सदस्यांनी विशेष कार्य केले यावेळी अकोला जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment