सण उत्सव शांततेत साजरे करा... अप्पर पोलीस अधीक्षक मोनीका राऊत

सण उत्सव शांततेत साजरे करा... अप्पर पोलीस अधीक्षक मोनीका राऊत 

बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी 
        आज दिनांक 22. 9 .2022 रोजी सायं.5.30 ते 6.10 वापर्यंत पोलीस स्टेशन बार्शिटाकळी येथे मा. अप्पर पोलीस अधीक्षक साहेब अकोला, तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मुर्तीजापुर यांच्या मार्गदर्शनाखाली नवदुर्गा उत्सव स्थापना व विसर्जन संदर्भात शांतता समिती सभा घेण्यात आली त्यामध्ये शांतता समिती सदस्य व नवदुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष असे 60 ते 65 नागरिक हजर होते.
त्याचप्रमाणे 6.15 ते 7.00 वाजे पर्यंत धम्मचक्र मिरवणूक संदर्भात शांतता समिती सदस्य व धम्मचक्र चे अध्यक्ष पदाधिकारी यांची मीटिंग घेण्यात आली त्यामध्ये 40 ते 50 नागरिक हजर होते.तसेच 7.01 ते 7.20 वाजे पर्यंत ईद-ए-मिलाद संदर्भात शांतता समिती सदस्य व ईद चे पदाधिकारी यांची मीटिंग घेण्यात आली योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.
 त्यावेळी त्यांनी संबंधित सार्वजनिक नवरात्र मंडळ तसेच धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध बांधवांना सण उत्सव शांततेत साजरे करा व शोशल मिडीयावर जे अपहरणाचे व्हिडिओ वायरल होत आहेत त्याबद्दलही शांतता समीतीच्या सदस्यांना विनंती केली की त्यांनी आशा व्हिडिओ बद्दल होत असलेल्या व्हिडिओ वर विश्वास न ठेवता शांतता बाळगावी यावेळी मुर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संतोष राऊत साहेब, बार्शिटाकळीचे नगराध्यक्ष महेफुज खान रसुल खान, उपाध्यक्ष सुरेश जामनिक, मुख्याधिकारी शिवहरी थोंबे साहेब, बार्शिटाकळी चे पोलीस निरीक्षक श्री संजय सोळंके साहेब, उपनिरीक्षक निलेश तारक, आरोग्य सभापती सुनील शिरसाट, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, भारत बोबडे, अंनत केदारे, अन्सार उल्ला खान, मासुम खान, पुष्पाताई रत्नपारखी, शंकर वरघट,महेफुज पठाण, युशुफ शेठ,  प्रकाश खाडे, सादिक लीडर, अनील धुरंधर, अमोल जामनीक, सुनील बावने, अशोक जामनीक, शुभम ईगळे, सनी धुरंधर, विकी वाघमारे, भोला इनामदार, नकीम पठ्ठा, गोळा शेठ, सै रियासत, व मोठ्या संख्येने नवदुर्गा उत्सव मंडळाचे व धम्म चक्र प्रवर्तन मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक श्री संजय सोळंके यांनी केले तर आभार प्रदर्शन खुपिया विभागाचे प्रमुख श्री कीशोर पिंजरकर यांनी केले 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे