खेर्डा खुर्द येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाला सुरुवात
*खेर्डा खुर्द येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाला सुरुवात*
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
प्राथमिक आरोग्य केंद्र पिंजर च्या वतीने खेडॉ खुर्द येथे नवरात्रोत्सवात शासनाने १८ वर्षांवरील महिला, माता, गरोदर स्त्रियांसाठी आरोग्य तपासणी अभियान सुरू करण्यात आले आहे. सुरक्षित व सदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियान राबविले जात आहे. या अभियानातून गुरुवारी २९सप्टेंबर रोजी खेडॉ खुर्द येथे ७० महिलांची तपासणी करण्यात आली आहे.
राज्यात माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी होत असले तरी गरोदरपणात महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण अत्यल्प आढळत असते. ग्रामीण आणि अतिदुर्गम भागात तर महिलांच्या आरोग्य तपासणीकडे कुटुंबाकडून बऱ्याचदा दुय्यम स्थान देण्यात येत असते. प्रामुख्याने घरातील स्त्री आरोग्यदृष्ट्या सशक्त असेल तर घर सुरक्षित ही संकल्पना घेऊन नवरात्रोत्सवाच्या काळात ही योजना राबविण्यात येत आहे.
पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, तसेच अंगणवाडी केंद्रात आरोग्य शिबिरे घेण्यात येणार असून वैद्यकीय अधिकारी, डॉ आगलावे , आरोग्य जी,एच,घावट,एल,व्हि, भालेराव आरोग्य सेविका,एम,पी, डब्ल्यू, लोखंडे, गटप्रर्वतक बबिता जाधव अंगणवाडी सेविका आशा सेविका ज्योती इंगळे व मदतीने यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. नवरात्रोत्सवातील नऊ दिवस हे जास्तीत जास्त गर्भवती महिलांच्या सोनोग्राफीसाठी असतील. महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक त्या सर्व चाचण्या व तपासणी या काळात करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक सुविधाही देण्यात येणार आहेत.
या अभियानामार्फत महिला व मातांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी केली जाणार आहे. हिमोग्लोबीन, साखरेचे प्रमाण, लघवीची नियमित तपासणी केली जाणार आहे. यावेळी खेडॉ खुर्द येथील सरपंच भाग्यश्री संदीप चौधरी तसेच पंचायत समिती सदस्य संदीप चौधरी ग्रामपंचायत कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते
Comments
Post a Comment