जन्म घेणं आपल्या हातात नाही, पण परिस्थिती बदलणे नक्कीच आपल्या हातात आहे :- उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे गोर सेनेच्या विद्यार्थी सत्कार समारंभ यशस्वीपणे संपन्न....
जन्म घेणं आपल्या हातात नाही, पण परिस्थिती बदलणे नक्कीच आपल्या हातात आहे :- उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे
गोर सेनेच्या विद्यार्थी सत्कार समारंभ यशस्वीपणे संपन्न
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी आपले ध्येय ठरवतं कठोर मेहनत केली पाहिजे. जन्म घेणं जरी आपल्या हातात नसले तरी परिस्थिती बदलणं नक्कीच आपल्या हातात आहे असे प्रतिपादन अकोला जिल्हयाचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी व्यक्त केले आहे. ते आज गोर सीकवाडी पुरस्कृत रायसिना फाउंडेशनच्या तर्फे आज आयोजित जुने शहरातील खंडेलवाल महाविद्यालयात बोलत होते.
रायसीना फाउंडेशन यांच्या वतीने अकोला जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा पार पडला, गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेशभाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात इयत्ता दहावी बारावी मधील उत्कृष्ट टक्केवारी कमवणारे विद्यार्थी तसेच जेईई, निट, एमएचटी - सीईटी मधील प्राविण्य कमवणारे विद्यार्थी, यात सोबत युपीएससी, एपीएमसी,एसएससी नेट-सेट तसेच पीएचडी मधील प्राविण्य अमूल्य विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
सदरील गुणगौरव सोहळ्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून गोर सीकवाडी जिल्हा संयोजक बुलढाणाचे प्रा. भुजंग राठोड, एकलव्य इंडिया मूव्हमेंटचे सहसंचालक प्रशांत चव्हाण यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, जिल्हा परिषदच्या उपसभापती सावित्रीबाई राठोड, भूमीअभिलेख विभागाचे उप अधिकारी विनोद जाधव, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी अभियंता अनिल चव्हाण, डॉक्टर अरविंद चव्हाण, डॉक्टर वर्षा अरविंद चव्हाण, डॉक्टर सुनील चव्हाण, जळगाव येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे मनोज राठोड, वाशिम आरटीओ कार्यालयाचे जयसिंग राठोड, वाशिम पाटबंधारे विभागाचे दिलीप राठोड, बार्शीटाकळी पंचायत समिती सदस्य दादाराव पवार, ग्रामसेवक गोविंद चव्हाण, गोरसिकवाडीचे जिल्हा सहसंयोजक रवींद्र जाधव, गोरसेना विदर्भ अध्यक्ष मनोहर राठोड, विभागीय अध्यक्ष सोनू चव्हाण, गोर सेना चे जिल्हा उपाध्यक्ष अजबराव चव्हाण, जिल्हा सचिव शालिग्राम राठोड, गोर सेनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुरेश राठोड, पातुर तालुका गोर सेना अध्यक्ष गणेश राठोड, पातुर तालुका प्रसिद्धीप्रमुख डॉ. मंगेश चव्हाण, बार्शीटाकळी तालुक्याचे संघटक अविनाश राठोड, गोरसेना जिल्हा सोबती रुपेश राठोड, पंकज पवार, महेश राठोड, माजी जिल्हा अध्यक्ष रतन आडे आदी उपस्थित होते.
जुने शहर येथील बंजारा समाजाचे नायक प्रकाश राठोड, हसाबी लक्ष्मण जाधव, नसाबी भगवान राठोड, गोरसेना जिल्हा सोबती सुजित राठोड, देवानंद राठोड, नरेश राठोड यांची उपस्थिती लाभली. या भव्य सत्कार समारंभ मध्ये शंभरच्यावर विविध क्षेत्रात प्राविण्य कमविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन मान्यवरांनी गौरविले. या सत्कार समारंभाचे विशेष आकर्षण म्हणजे नीट परीक्षेमध्ये उत्कृष्ट गुण मिळवनाऱ्या कु. वैष्णवी राठोड तसेच नेपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय रनिंग स्पर्धेमध्ये उत्कृष्ट पारितोषिक मिळविणाऱ्या अजनी गावातील कु. पायल पवार यांचा शॉल, श्रीफळ तसेच मानचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोरसिकवाडी चे सहसंयोजक रवींद्र जाधव यांनी केले तर संचालन राहुल जाधव यासोबत आभार प्रदर्शन वृषाली जाधव यांनी मांडले. या भव्य सत्कार समारंभ करिता अकोला शहरातील सुप्रसिद्ध शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाने भरभरून सहकार्य केले.
Comments
Post a Comment