कीटकनाशक फवारणी करत असताना घ्यावयाची काळजी जनजागृती अभियान......

*कीटकनाशक फवारणी करत असताना घ्यावयाची काळजी जनजागृती अभियान*


महाराष्ट्र राज्य कृषी विभाग व एफएमसी प्रा ली. यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी फवारणी करत असताना घ्यावयाची काळजी हा जनजागृती अभियान सोहळा दिनांक 22/8/22 रोजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई भोजने यांच्या हस्ते पार पडला होता.
या उद्घाटन सोहळ्याला मुख्ये उपस्थितीमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पाताई इंगळे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार गट नेते गोपाल भाऊ दातकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुभाष पवार जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शाह कृषी विकास अधिकारी मुरली इंगळे जिल्हा परिषद मोहिम अधिकारी मिलिंद जंजाळ जिल्हा परिषद विभागाचे संजय गवळी 
या सर्वांच्या उपस्थिती मध्ये एफ एम सी कंपनीचे एरिया मार्केटिंग मॅनेजर हिरामण मंडळ सर तसेच अकोला जिल्हा कृषी प्रतिनिधि शत्रुघ्न उपरवट यांनी शेतकरी कीटकनाशक फवारणी करत असताना घ्यावयाची काळजी या बद्दल मार्गदर्शन केले होते तसेच वरील सर्व मान्यवरांनी शेतकऱ्यांना विषबाधा होऊ नये या संदर्भात मार्गदर्शन केले होते.
2017 मध्ये यवतमाळ जिल्हा मध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विषबाधा झाली असल्याने कृषी विभागाने सातत्याने शेतकऱ्यासाठी निरंतर जनजागृती कार्यक्रम आयोजित केले आहे.
तसेच गेल्या दोन वर्षांपासून एफ एम सी कंपनी सातत्याने अवघ्या अकोला जिल्हा भर शेतकरी कीटकनाशक फवारणी करत असताना घ्यावयाची काळजी या करिता शेतकऱ्यांना गावा गावा मध्ये जनजागृती रथाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गर्शन करत आहे.
गेल्या २२/८/२२ तारखे पासून एफ एम सी कंपनी आणि महाराष्ट्र राज्य कृषी विभागा कडून अकोला जिल्ह्यातील सात ही तालुक्यातील १२० गावाना, गावातील ग्राम पंचायत असेल किंवा शाळा , विद्यालये, महाविद्यालये तसेच गावातील चौका मध्ये , शेतकरी फवारणी करत असताना घ्यावयाची काळजी तालुका कृषि अधिकारी, तसेच एफ एम सी कंपनीचे प्रतिनीधी यांनी एकत्र येऊन गावा गावा मध्ये विषबाधा जनजागृती अभियान रथाच्या माध्यमातुन मार्गदर्शन केले.
विषबाधा जनजागृती अभियान रथ हा १२० गावा मध्ये फिरवण्यात आला. त्याचं प्रमाणे शेतकरी व शेतमजूर यांना ५६० सुरक्षा किट मोफत वाटण्यात आल्या. गावा मध्ये बॅनर, भित्ती पत्रके, लित्रेचर, पोस्टर लावण्यात आले.अकोला जिल्ह्यातील सर्व तालुका मध्ये तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक,कृषी सेवक यांनी व एफ एम सी कंपनीचे प्रतिनीधी एकत्र येऊन शेतकऱ्यांना विषबाधे बद्दल मार्गदर्शन केले गावा गावा मधून शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
आज दिनांक २६/९/२२ गेल्या महिन्या भरापासून विषबाधा जनजागृती अभियान रथाच्या माध्यमातून प्रसार आणि प्रचाराचे कामाचा निरोप समारोहपण बार्शी टाकळी तालुक्यातील आळंदा येथे जय बजरंग विद्यालय मध्ये पार पडला.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर महाविद्यालयाचे प्राचार्य मा शत्रुघ्न बिरकड सर, तालुका कृषी अधिकारी मां संजय चांदूरकर सर, मा टोबरे सर, मा पल्हाडे सर, मा देवबाले सर, मा सांगळे सर, मा. जऊलकार सर होते.
कार्क्रमाचे सूत्र संचालन मा देवबाले सर यांनी केले. तसेच कार्यक्रमांची सुरुवात संजय चांदुरकर सर यांनी केली. शत्रुघ्न बिरकड सर यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्याना विषबाधे बद्दल शेतकऱ्यांना विषबाधा होऊच नये हा संदेश विद्यार्थ्या कडून त्यांच्या वडिलांना हा संदेश आपल्या भाषणातून दिला व एफ एम सी कंपनीचे जिल्हा प्रतिनीधी श्री शत्रुघ्न उपरवट यांनी विषबाधा जनजागृती अभियान अंतर्गत पुर्ण मार्गदर्शन केले. 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे