कै. अण्णासाहेब पाटील यांची जयंती - मराठा महासंघातर्फे त्यांना विनम्र अभिवादन

कै. अण्णासाहेब पाटील यांची जयंती - मराठा महासंघातर्फे त्यांना विनम्र अभिवादन 
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी.
आज दिनांक 25/09/2022 रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक व माथाडी कामगार नेते कै. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री विनायकराव पवार, अमरावती विभागीय अध्यक्ष श्री कृष्णा भाऊ अंधारे, महासंघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मा. जिल्हा अध्यक्ष मधुसूदन शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री अविनाश दादा नाकट यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात कै.स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती करण्यात आल्या यामध्ये महिला जिल्हाध्यक्ष तसेच पातुर आणि बार्शीटाकळी तालुका यांची कार्यकारणी जाहीर करून नवीन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अरविंद दादा नाकट यांनी तर आभार प्रदर्शन श्री डॉ श्रीकांत काळे सर यांनी मानले.यावेळी महिलाअध्यक्षा सौ.बिडवे ताई,जिल्हासरचिटणिस शंतनु भैय्या वसु,जिल्हा प्रसिद्धि प्रमुख सचिन गोमासे,युवक शहर अध्यक्ष विपुल माने,युवक विद्यार्थी अध्यक्ष पृथ्वीराज गावंडे, नव निर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष गणेश राव थोरात पाटील,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे