इस्लाहे माशेरा व सिरत्तूंनबी (स) निमित्त मस्जिद अक्सा मध्ये कार्यक्रम संपन्न...
इस्लाहे माशेरा व सिरत्तूंनबी (स) निमित्त मस्जिद अक्सा मध्ये कार्यक्रम संपन्न...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी.
ऑल इंडिया मुस्लिम. पर्सनल लॉ बोर्ड व इसलाहे माशेरा कमिटी बार्शी टाकळी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सिरतूंनबी (स) हजरत मोहम्मद पैगंबर च्या जीवनावर आधारित व्याख्यान स्थानिक मस्जिद अक्सा खडक पुरा येथे हुसैनिया मदरसा चे शेखुल हदीस मौलाना नाजिम साहेब यांनी सादर केले.
कार्यक्रमा ची सुरूवात तीलावत ए कुराण ने करण्यात आली असून सदर कार्यक्रमात अध्यक्ष पदी जामा मस्जिद चे इमाम व खतीब मौलाना अजीज उल्लाह खान तर प्रमुख अतिथी मध्ये मस्जिद अक्सा चे इमाम व खतिब मौलाना एजाज साहेब,हाजी सय्यद रागिब,हाजी सय्यद आशिक,हाजी तहसिनोड्डीन, सय्यद इरफान पहिलवान,हाफीज खलिदुर्र रहमान आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर कार्यक्रम पार पडले या साठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड चे मुफ्ती साद खान,मेजर अकलिमोड्डीन,आदर्श शिक्षक नाशीत अली,मास्टर शकील आदी नी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment