बार्शीटाकळीच्या पुरातन कालंका माता मंदिर रस्त्यावर भलामोठा खड्डा..

बार्शीटाकळीच्या पुरातन कालंका माता मंदिर रस्त्यावर भलामोठा खड्डा
स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष
बाहेरून येणाऱ्या भाविकांना अपघात होण्याची दाट शक्यता


बार्शीटाकळी ( बाळकृष्ण उताने पाटिल )
      बार्शीटाकळी येथील केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीखाली येणाऱ्या पुरातन,एका अखंड दगडावर हेमाडपंथी बांधकामाचा अद्भुत नमुना असलेल्या कालंका माता मंदिरात नवरात्रोत्सवात हजारो भाविक हे बाहेरून एक दगड व आत गेले तर अप्रतिम अशा शिल्पकलेचा नमुना असलेल्या मंदिरात दर्शनासाठी येतात. मागील काही वर्षे कोरोनाच्या कालखंडात मंदिरे बंद असल्यामुळे भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला नाही. परंतु आता सर्वच मंदिरे उघडलेली आहेत. म्हणून यावेळी भाविकांचा ओघ वाढलेला दिसून येत आहे . या मंदिरात सुद्धा गेल्या चार दिवसापासून भक्तांची गर्दी होतांना दिसून येत आहे परंतु मंदिरात पोचण्याच्या मार्गावर भला मोठा खड्डा असल्यामुळे वाहन चालवताना खुप कठीण जाते. खोलेश्वर रस्त्यापासूनच कालंका माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झालेली पहायला मिळते.याबाबतीत स्थानिक प्रशासन व नगरसेवक उदासिनता बाळगून आहेत. मंदिराच्या रस्त्यावर जनावरे बांधलेली असतात. वाहने उभी केलेली असतात त्यामुळे सुद्धा मंदिरात जाण्यास त्रास होतो. मंदिरात जाण्यासाठी दिशादर्शक फलक सुद्धा लावलेला नाही.अश्या अनेक समस्यांना दुर करण्यात यावे अशी भक्तांची मागणी आहे. सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पोटेकर व माजी सैनिक श्रीकृष्ण आखरे यांनी या रस्त्याच्या दुरूस्ती करण्याबद्दल विनंती पत्र स्थानिक प्रशासानाला दिलेले आहे परंतु निगरगट्ट प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही.  

या रस्त्यावरील आवागमन करतांना जो त्रास होतो तो दुर करण्यात यावा याकरिता स्थानिक प्रशासनाला पत्र दिले आहे. परंतु नवरात्र सुरु होवूनही परिस्थिती जशीच्या तशीच आहे. 
श्रीकृष्ण आखरे 
माजी सैनिक 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे