वंचित बहुजन आघाडीची रांजदा सर्कल मधील शिंदखेड येथे र्बैठक संपन्न
*वंचित बहुजन आघाडीची रांजदा, शिंदखेड येथे सर्कल बैठक संपन्न*
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे महासचिव मिलिंद भाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 29 /9/ 2022 गुरुवारी बार्शीटाकळी तालुक्यातील जि.प. राजंदा सर्कल मधील पंचायत समिती राजंदा सर्कलमध्ये शिंदखेड येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेण्यात आले. यामध्ये तालुकास्तरावर किंव्हा सर्कल स्तरावर काम करणाऱ्यांची नावे सुद्धा घेण्यात आली. त्याचप्रमाणे यामध्ये तरुण तडफदार कार्यकर्ते राजदीप वानखडे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले ज्यावेळी प्रथमत बाळासाहेब आंबेडकर अकोला आले असता सगळ्यात आधी सभा झाली ती शिंदखेड मध्ये. त्याचप्रमाणे शिंदखेड या गावात 700 ते800 आसपास बौद्धांचे मतदान असून पण या गावात अकराशे च्या वर लोकसभा आणि विधानसभेला आजही मतदान होते म्हणजे आजही ओबीसी समाज हा पक्षाला जोडलेला आहे दिसून येते .ज्येष्ठ नागरिकांनी आपले मनोगत सुचवले यामध्ये प्रामुख्याने एक विषय निघाला बरेच ज्येष्ठ नागरिक म्हणाले आजपर्यंत सभा, आंदोलन, निवेदन, मिटिंग अशा प्रकारची पक्षाचे जे कार्यक्रम असतात ते कळवा . यामध्ये वंचित बहुजन आघाडी बाशिटाकळी तालुक्याचे प्रसिद्धीप्रमुख मिलिंद करवते यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले, यावेळेस ऍड श्रध्देय,बाळासाहेब आंबेडकरांनी नव्या दमाचे नवीन पदाधिकारी निवडलेले आहेत. यामध्ये रजिस्टरमध्ये स्वतःचं नाव मोबाईल नंबर आणि सही करावी यानंतर होणार पक्षाचा कुठलाही कार्यक्रम यासंदर्भात मला फोन किंवा वैयक्तिक मेसेज येणार,आणि तुम्हाला तुमचा सन्मान मिळेल याची आम्ही ग्वाही देतो. पं स गटनेते रामदास घाडगे यांनी ता. महासचिव अजय अरखराव आणि माजी जिल्हा सचिव संतोष वणवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आदरणीय प्रवीण भाऊ वानखडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आज घराघरात मध्ये कसे पोहोचतील वंचित बहुजन आघाडी पक्ष कसा बळकट होईल याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे ही महत्त्वाची बाब त्यांनी आपल्या शब्दात सांगितली. नंतर अध्यक्षीय भाषणात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रतन आडे यांनी सांगितले ज्या प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी चा बालेकिल्ला अकोला म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी चा बालेकिल्ला बार्शीटाकळी तालुका हा होता पण गेल्या अडीच वर्ष आधी जिल्हा परिषद मध्ये आपण कुठेतरी चुकलो याचा आपण अभ्यास केला पाहिजे मागचे सगळे मतभेद विसरून सगळ्यांनी नवीन जोमाने कामाला लागायला पाहिजे आणि साहेबांनी दिलेल्या आदेशाचे पालन आपण निश्चितच कराल तुमच्याकडून आशा करतो अशा प्रकारे बऱ्याच नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी देऊन त्यांचे मन समाधान झाले असे दिसून आले. कार्यक्रमाच्या सरतेशेवटी समता लेझीम पथक व समता आखाडा यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अकोला येथे मिरवणुकीत यांचा सहभाग असतो ते करत असलेल्या प्रॅक्टिस चे दृश्य पाहून गावात जणू काही आनंदाचे वातावरण पसरत आहे अशे दिसून आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ वानखडे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुक्याचे प्रसिद्धी प्रमुख मिलिंद करवते यांनी केले
तरी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थिती होती. वंचित बहुजन आघाडी ता अध्यक्ष रतन आडे, महासचिव अजय अरखराव, संघटक हरीश रामचवरे, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष प्रवीण वानखडे, पं समिती सदस्य तथा गटनेते रामदास घाडगे, पं समिती सदस्य पती दिनेश मानकर पं समिती माजी सदस्य सुनील वानखडे, माजी जिल्हा सचिव संतोष वनवे, श्रीकृष्ण देवकुणबी, राजदीप वानखडे, देवानंद पवार, पंकज वानखडे,प्रवीण वानखडे, शिवदास वानखडे, राहुल खंडारे, अविनाश वानखडे,,प्रवीण राहुल वानखडे, सागर वानखडे, सहदेव काळदाते, गणेश उपरवट, अनिल वानखडे, विजय वानखडे माणिकराव वानखडे,काशिनाथ वानखडे,अनंता वानखडे, अक्षय गवई, शुभम वानखडे, नील खंडेराव, सतीश गोपाल वानखडे, अनिरुद्ध खंडेराव, चंद्रकांत इंगळे, गणेशराव चंद्रकांत खंडारे,,राजरत्न अरखराव, पुरुषोत्तम अरखराव, विष्णू वानखेडे दिनेश सावद, उल्हास वानखडे,शुभम वानखडे,जगन्नाथ वानखडे, सौरभ उपरवत,अनिकेत वानखडे, अक्षय वानखडे, आकाश वानखडे, विशाल वानखडे, संतोष खंडारे माजी सर्कल अध्यक्ष, रमेश वानखडे, मनोहर वानखडे,रामेश्वर वानखडे, गोपाल वानखडे, शेषराव वानखडे, कपिल वानखडे, अतुल वानखडे, निलेश वानखडे, शिवा इंगळे, महेंद्र निखाडे, राहुल अरखराव,सरपंच राजंदा. श्रीकृष्ण सोळंके,उपसरपंच राजंदा. राहुल घोंगे, ग्रामपंचायत सदस्य राजंदा. विजय किसन भगेवार, ग्रामपंचायत सदस्य राजंदा.अशोक गोवर्धन वानखडे,प्रवीण वानखडे, सुशील रामेश्वर वानखडे, सुमित समाधान वानखडे,,विनोद भगवानराव, हर्षल सेवानंद जाधव, शेषराव काळदाते, बरेचसे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
Comments
Post a Comment