गुलाम नबी आझाद महाविद्यालयात रक्त दानावर कार्यशाळा संपन्न...
गुलाम नबी आझाद महाविद्यालयात रक्त दानावर कार्यशाळा संपन्न
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शीटाकळी : स्थानीक गुलाम नबी आझाद महाविद्यालय, बार्शीटाकळी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व मा. प्राचार्य डॉ मधुकरराव पवार यांच्या प्रेरणेने रक्त गट समज- गैरसमज व रक्त दानाचे फायदे या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिवसाचे औचीत्य साधुन, शासकीय रक्त पेढी, जि एम सी अकोला येथील तज्ञ टीम च्या मदतीने या कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रा. एस के राऊत हे अध्यक्ष म्हणून तर प्रमुख मार्गदर्शक
शासकीय रक्तपेढी टिम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला हे लाभले होते. मार्गदर्शक टिम मध्ये डॉ. अमोल शेंडे, डॉ. शुभम भोसले, डॉ अभीशेख देशमुख व श्रीराम राठोड यांचा समावेश होता. मान्यवरांनी मार्गदर्शनामधे भारतात एकुण डोनर कीती व रक्ताची आवशकता कीती यामधील फरक स्पष्ट केला. सोबतच
रक्त गट तपासणी व रक्त दानाचे मानवी जीवनात असलेले अनन्यसाधारण महत्त्व या विषयावर सखोल प्रकाश टाकला. विविध आजार कमी करण्यासाठी विशेषतः युवा वर्गामध्ये रक्त दानाचे महत्त्व वेगवेगळ्या प्रकारच्ये दाखले देउन समजावले व कार्यशाळेची शोभा वाढवली. डॉ राउत सरानी महाविद्यालयीन जीवनामध्ये एन एस एस चे महत्त्व या विषयावर लक्ष केंद्रित केले. पुढे बोलताना स्वताचा व देशाचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी कशी घडविते या वर मार्गदर्शन केले. एकुनच कार्यक्रमामधुन रक्त दानावीषयी उत्सुकता व प्रेरना निर्माण होऊन राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व स्पष्ट झाले. दिप प्रज्वलाने व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ह्या कार्य शाळेमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. सोबतच महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीते करिता राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधीकारी डॉ व्हि एस ऊंडाळ तथा डॉ व्हि बी कोटंबे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यशाळेची सुत्रसंचालन महादेव खंदारे, रेणुका फतटकर तर आभार प्रदर्शन शालीनी राठोड यांनी पार पडली. सर्वात शेवटी आभार प्रदर्शनानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Comments
Post a Comment