सरसगट बार्शिटाकळी तालुक्याला पिक विमा मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवेदन
सरसगट बार्शिटाकळी तालुक्याला पिक विमा मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवेदन
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शीटाकळी तालुक्यामध्ये फक्त बार्शीटाकळी मंडळ मध्येच पाऊस झाला आणि त्यामुळे शेतीचं नुकसान झालेलं आहे म्हणून फक्त बार्शीटाकळी मंडळ करिता पिक विमा मंजूर करण्यात आला शासनाच्या निर्देशानुसार त्याची नुकसान भरपाई म्हणून 25 टक्के रक्कम देण्याचे शासनाचे आदेश आले परंतु वस्तुस्थिती वेगळीच असून कृषी विभागामार्फत प्रत्येक मंडळामध्ये पर्जन्यमापक यंत्र बसवलेलं असते आणि ते पर्जन्यमापक यंत्र मोकळ्या जागेवरती ठेवून पावसाची सरासरी मोजली जाते परंतु कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ते पर्जन्यमापक यंत्र खेडॉ मंडळांतर्गत दोनद शिवारात ए ईकलास जमिनीवरती ठेवलेला आहे त्याच्या आजूबाजूला पूर्णतः गाजर गवत आणि जंगली गवत वाढला त्यामुळे तेथील पर्जन्यमान नेमकं किती झाल हे कृषी अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिले त्यानंतर बार्शीटाकळीचे कृषी अधिकारी वाशिमकर साहेब यांनी दोनद ला जाऊन पाहणी केली बार्शीटाकळी तालुक्याच्या वतीने तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदार साहेब यांना संपूर्ण बार्शीटाकळी तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झालेली आहे ही बाब लक्षात आणून दिली खेडॉ. पिंजर महान तसेच इतर मंडळ मध्ये पिक विमा मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले यावेळी सुमंन गावंडे यांच्या नेतृत्वात संग्राम गावंडे यांच्या मार्गदर्शनानुसार निवेदन देण्यात आले त्यामध्ये बार्शीटाकळी चे तालुकाप्रमुख सतीश गावंडे गोपाल कटाळे बळीराम सुर्वे महादेव मानकर गजानन पाटील काकड शरद पाटील काकड बाबुलाल भाऊ राठोड पुंडलिक चव्हाण सागर कावरे प्राध्यापक खिराडे बाजार समितीचे सभापती शेंडे अवि दादा ठाकरे शरद पाटील काकड राजू पाटील महल्ले गणेश महल्ले रमेश राठोड प्रकाश चव्हाण विठ्ठल कावरे गोपाल महल्ले मोहन सोनुले आनी तालुक्यातील सर्व शेतकरी मंडळी उपस्थित होते
Comments
Post a Comment