देगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रा. पं. सदस्यांसह विविध समाजबांधवांनी केला वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
*देगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रा. पं. सदस्यांसह विविध समाजबांधवांनी केला वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश*
बाळापुर प्रतिनिधी
ऑड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बाळापूर तालुक्यातील देगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रा. पं. सदस्यांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे यांच्या हस्ते देगाव येथे भव्य जाहिर प्रवेश सोहळा आयोजित करुन आपल्या समर्थकांसह प्रवेश केला.
या जाहिर प्रवेश सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी. पं. स. सभापती गोविंदराव कोगदे हे होते तर या सोहळ्याला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देडवे जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे, तालुकाध्यक्ष अनंतराव फाटे, देगाव जि.प. सर्कलचे जि. प. सदस्य रामभाऊ गव्हाणकर, प.स. सभापती सौ. रूपालीताई गवई, मा. जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव, पं. स. सदस्य सौ.शारदाताई सोनटक्के, ता. संघटक ज्ञानेश्वर पाचपोहे, ता. कोषाध्यक्ष सादिक भाई, ता.प्रसिद्धी प्रमुख सुमेध अंभोरे, प.स. गटनेते अफसर खान, मंगेश गवई, सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पल्हाडे, प्रभाकर लढे, शिवहरी धर्माळे, क्षिरसागर अंभोरे, तंटामुक्ती अध्यक्ष जगजीवनराम कातखेडे, जगन तराळे, शेख मुन्नाभाई, विष्णू भाकरे, मदन अवचार, ग्रामपंचायत सदस्य सौ. प्रियाताई शेगोकार,ग्रामपंचायत सदस्य सौ.गीताताई लढे, प्रमोद इंगळे, रमेश इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेला स्विकारुन देगाव ग्रामपंचायत सरपंच सौ दिपाली सरदार,देगाव उपसरपंच सौ. पुष्पाताई भाकरे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर मसने, विजय सरदार, राजेश सरदार सामाजिक कार्यकर्ते संजय कोगदे,अजय पुरी, राजू चहाकर, शुभम गावंडे,शेख शिगिर, बांधकाम ठेकेदार संतोष पाटखडे वैभव अतकर,आदींनी वंचित बहुजन आघाडीत हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत जाहिर प्रवेश केला. प्रवेश सोहळ्याला संबोधित करतांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे यांनी प्रवेशकर्त्यांना योग्य निर्णय घेतल्याने तुमचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली. जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे यांनी आपल्या मनोगतातुन प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना पाठबळ देत "या नंतर जर कोणी तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर तो थेट वंचित बहुजन आघाडीला डिवचण्याचा प्रयत्न असेल, त्यामुळे अश्या कुबुद्धी असलेल्यांना वंचितच्या वतीने धडा शिकवला जाईल." असा इशारा दिला. या जाहिर प्रवेश सोहळ्याचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सावदेकर गुरुजी यांनी तर आभार प्रदर्शन सुमेध अंभोरे यांनी केले. या भव्य जाहिर प्रवेश सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी रामकृष्ण सोनटक्के व बाळापूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment