दगडपारवा येथे जनावरांना लंम्पी या आजारावर औषधीचे लसीकरण

दगडपारवा येथे जनावरांना लंम्पी या आजारावर औषधीचे लसीकरण
बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी
तालुक्यांतील ग्राम दगडपारवा येथे लंम्पी या रोगावर लसीकरण व औषध उपचार डॉ गणेश डिगांबर महल्ले जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी अकोला याचां उपस्थित करण्यात आला.आज महाराष्ट्रभर लंबी या रोगाने प्रचंड दहशत निर्माण केली आहे तसेच संपूर्ण जिल्ह्यामध्ये या रोगाचा प्रार्दुभाव होत आहे या रोगाची लागण आज खेड्यापाड्यात पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान या रोगाने होत आहे बरेच गुरेढोरे या रोगाला बळी पडत आहेत हा रोग विषाणूजन्य असल्याकारणाने याचा प्रादुर्भाव वाढत आहे शेतकऱ्याने बाधित झालेले गुरेढोरे चांगल्या जनावरांपासून वेगळे बांधावे तसेच त्यांचे चारा पाणी वेगळेतसेच त्यांचे चारापाणी वेगळे करावे व या रोगाने मरण पावलेले जनावरं जमिनीमध्ये आठ फूट गड्डा करून त्यामध्ये त्यांच्या अंगावर चुना टाकून तो गड्डा पूर्णपणे पुरून टाकावा जेणेकरून विषाणूंचा प्रादुर्भाव रोखता येईल या रोगासाठी सतत अहोरात्र प्रयत्न करणारे आमच्या बाजूच्या कडी मधील पशुचिकित्सालय मधील सर्व पथक प्रयत्न करीत आहे 2 सप्टेंबर2022 रोजी दगडपारवा येथे  पहिला पेशंट मिळाला तेव्हापासून त्यानंतर लगेचच गावात लसीकरण मोहीम राबवली गेली त्यात 465 जनावरांना लसीकरण करण्यात आले दगड पारवा या गावांमध्ये 25 ते 26 बाधित जनावरे आहेत त्यांच्यावर सध्या उपचार करण्यात  येत आहे यावेळी डॉक्टर स्नेहल पाटील , डॉक्टर गोळे साहेब , डॉक्टर तायडे साहेब , डॉक्टर रणजीत राठोड , तसेच सावरकर सर्व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहे.या कार्याला व त्यांच्या प्रयत्नांना गणेश महल्ले पाटील तसेच गावकरी  मंडळीकडून  धन्यवाद करीत आहे 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे