जमीअत ए उलमा च्या वतीने आयोजित केलेल्या हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित परीक्षेस उत्तम प्रतिसाद. सुमारे संपूर्ण तालुक्यात 750 मुलामुलींनी घेतला भाग. बक्षीस वितरण 9 नोव्हेबर रोजी.

जमीअत ए उलमा च्या वतीने आयोजित केलेल्या हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित परीक्षेस उत्तम प्रतिसाद.
सुमारे संपूर्ण तालुक्यात 750 मुलामुलींनी घेतला भाग.

बक्षीस वितरण 9 नोव्हेबर रोजी.
 
प्रतिनिधी. बार्शिटाकळी ,
     सिरत्तूंनाबि च्या निमित्ताने हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित प्रश्नावर नुकतेच जिमिअत ए उलमा च्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेस तालुक्यात उत्तम प्रतिसाद मिळाला असून सदर परीक्षेस तालुक्यातील 21 मदरसा (मकतब) चे 750 मुलामुलींनी भाग घेतला.

      सदर परीक्षा ही जिमिअत ए उलमा चे तालुका अध्यक्ष मौलाना अब्दुल सलाम यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष मौलाना सय्यद वसी उल्लाह, तालुका सचिव हाजी सय्यद आशीक , मौलाना अजीज उल्लाह खान , मौलाना मोहम्मद एजाज व शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान , ज्येष्ठ पत्रकार मुफिज खान यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.

     तालुक्यातील महान,पिंजर,जमकेश्वर व बार्शिटाकळी येथे आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित 200 प्रश्नाची प्रश्पत्रिका देण्यात आली होती.बक्षीस वितरण 9 नोव्हेबर रोजी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले असून परीक्षेस बसणाऱ्या मुलांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.परीक्षक म्हणून मुफ्ती शेख इमदाद , मौलाना मोहम्मद सालिम , मुफ्ती जुबेर , मुफ्ती सय्यद शाकीर , मुफ्ती मोहम्मद वसीम , मौलवी असलम , मौलवी मोहम्मद शोएब , हाफीज सलमान , हाफीज असलम , हाफीज शकिरोद्दिन , कारी अब्दुल बासित , मौलवी आकिब , हाफीज रहबर , मौलवी मकसुद , हाफीज इरफान , हाफीज वसीम , हाफीज नाझिम , मुफ्ती कासिम , हाफीज मोहम्मद जमील , हाफीज मोहम्मद अलीम , पिंजर हाफीज इनायत खान , मौलवी तौफिक , मौलवी शाकीर , मौलवी साबीर महान हे राहणार आहेत. सदर कार्यक्रमात हाजी सय्यद रागिब , शेख इब्राहिम , मास्टर युसुफ खान , मास्टर शब्बीर खान , सय्यद इरफान पहेल्वान , हाजी रफीक सेठ , शकील चौधरी, हाजी सय्यद रफीक , मास्टर सादिक , मास्टर आरिफोद्दिन , मास्टर इजाजुररहेमान , डॉ नासिरोद्दिन , मास्टर असलम खान, मास्टर अझहर रोद्दिन, मास्टर सय्यद रिजवान , मास्टर एजाज खान, मास्टर असरार, यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी करण्या साठी मजहर उल इस्लाम खान, सलिमोद्दिन, मोहम्मद आसिफ व खादिम मोहम्मद सूफ्यान यांनी परिश्रम घेतले.
छाया , जमीयत ऊ ले मान चेमौलाना परिक्षा घेताना , 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे