परतीच्या पावसाने हाल; सोयाबीन कपाशीत पाणी पिंजर परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली

परतीच्या पावसाने हाल; सोयाबीन कपाशीत पाणी
(पिंजर परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली)


बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
पिंजर परिसरातील सोयाबीन पीक काढणीला आले असताना परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले.या पावसामुळे कपाशी पिकालाही फटका बसला असून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत या परिसरात पिंजर, भेंडीमहाल,खेडॉ भागई,भेंडीसुत्रक, वडगांव,निंबी, जनुना,टिटवा,खेडॉ खुर्द, पिंपळगाव,पाराभवानी, मोझरी खुर्द,उमरदरी,या भागात पिकांचे प्रचंड नुकसान झाले.आहे.अनेक ठिकाणी कोंब फुटण्याची स्थिती निर्माण झाली.सध्या शेतात सर्वत्र पाणी साचल्याने सोयाबीन काढवे कसे,अशा प्रश्न उभा ठाकला आहे.तर दुसरीकडे तोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय,या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.१८ऑक्टोबर रोजी मंगळवारी झालेल्या पावसामुळे नदी ,नाले खळखळून वाहत असून कपाशीलाही फटका बसला आहे.सोयाबीन काढणीला आले अनेक ठिकाणी कोंब फुटण्याची स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले..

_________________________ 
                चौकट

भेंडीमहाल शिवारात यावर्षीही अधिकाश क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे.सतत ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन बऱ्यापैकी होते;मात्र सतत तिन- चार दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले...


किसन कनिराम राठोड 
       शेतकरी भेंडीमहाल 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे