राजंदा शेतशिवारात वन्यप्राण्यांच्या धडकेत शेतमजुर गंभीर जखमी *उपचारासाठी नागपूर येथे हलवले

राजंदा शेतशिवारात वन्यप्राण्यांच्या धडकेत शेतमजुर गंभीर जखमी 
*उपचारासाठी नागपूर येथे हलवले 
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी 
बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा शेत शिवारात कापशी रोड येथील शेतमजूर सोयाबीन सोंगण्या साठी गेले होते सोयाबीन सोगत असतांना अचानक नीलगायच्या (रोहिट )धडकेत एक शेतमजूर महिला गंभीर जखमी झाली असून तिला अकोला येथील सर्वोच्च रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना  पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठवले आले आहे कापशी रोड येथील शेतमजूर गोविंद नरसिंग डाबेराव व त्यांची पत्नी आशा गोविंद डाबेराव  हे राजंदा  शेतशिवारात सोयाबीन सोंगण्याकरिता गेले होते सोयाबीन सोंगत असताना अचानक नीलगाय आल्याने नीलगाईने शेतमजुर महिला आशा डाबेराव   हिला जब्बर धडक दिली धडक दिल्याने शेतामध्ये असलेल्या मजुरांनी कापशी रोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमिक उपचार करण्यासाठी आणले असता येथील डॉक्टरांनी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले तेथे उपचार करत असताना त्यांची प्रकृती चिंताजनक वाटल्याने त्यांना तत्काळ नागपूर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे त्यामुळे पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले असून त्यांचे आर्थिक परिस्थिती गंभीर असल्याने  त्यांना वनविभागाच्या मार्फत तत्काळ मदत  देण्याची मागणी कापशी रोड येथील पत्रकार मंगेश चराटे व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे