न.प.आकोट मधील रखडलेले जनतेचे कामे व इतर कामे त्वरित करा नाहीतर ठिय्या आंदोलन करू लखन इंगळे यांचा उपजिल्हाअधिकारी व मुख्यअधिकारी यांना इशारा

*न.प.आकोट मधील रखडलेले जनतेचे कामे व इतर कामे त्वरित करा नाहीतर ठिय्या आंदोलन करू लखन इंगळे यांचा उपजिल्हाअधिकारी व मुख्यअधिकारी यांना इशारा* 
अकोट तालुका प्रतिनिधी
गोरगरीब लोकांच्या हितासाठी नेहमी सक्रिय असलेले लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आकोट यांनी मा.उपजिल्हा अधिकारी अकोला 
मा.मुख्यअधिकारी साहेब नगर परिषद आकोट यांना गोरगरीब लोकांचे विविध रखडलेले कामे व संबंधित अधिकारी यांच्यावर योग्य कारवाही करण्या संदर्भात निवेदन देऊन ठिय्या आंदोलना चा इशारा दिला आहे आंदोलनात प्रमुख मागण्या अश्या होत्या की 1)अतिक्रमण जागेचे पट्टे बहाल /जागा नियेमानुकूल करीता केलेला प्रभागातील अधुरा सर्वे पुर्ण करण्यात यावा 2)प्रधानमंत्री घरकुल चे लाभार्थी यांना कित्येक महिन्यापासुन बांधकाम परवानगी दिली त्यांच्या खात्यात तोरीत चेक जमा करा
3)रमाई घरकुल योजनेचे रखडून पडलेले अर्ज याचा निधी मागवून नवीन यादी अपडेट करा.
4)राहुल नगर 100 % टक्के दलित वस्ती मधील मंजुर कामे वर्क ऑर्डर देऊन तोरीत चालु करा
5)गुंठेवारी लाभार्थी यांचे रखडून पडलेले अर्ज तोरीत निकाली काढा 6)न.प.आकोट यांनी आकरलेले मनमानी घरावरील टॅक्स कमी करा
7)सिद्धार्थ नगर व सत्ती मैदान अंजनगाव रोड आकोट येथे मोठे हायमोक्स लाईट तोरीत लावा
8)वाटर सप्लायची अधुरी पाईप लाईन सत्ती मैदान अंजनगाव रोड परियंत टाकलेली असुन पुढे गौरी ढाबा न.प. हद्दी परियंत टाकण्यात यावी
9)नगर परिषद आकोट मधील संबंधित अधिकारी /कर्मचारी यांना निलंबित करा कारण यांनी काम झालेले असतांना त्याच कामाचे टेंडर काढून त्याच कामाला वेगवेगळ्या नावाने प्रस्तावित केले यांनी जिल्हाधिकारी साहेब यांची दिशाभूल करून प्रशासकीय मान्यता घेतली ठराव नसताना कामे केली काही चुकीचे ठराव लावण्यात आले दलित वस्ती मधील निधी हा सवर्ण वस्तीत वळती केला ठराव 15 वित्त आयोग व 14 वित्त आयोग मध्ये प्रस्तावित करण्यात आला कामे झालेले नसताना कंत्राकदाराला चुकीचे बिले देण्यात आली करीता यांच्या वर योग्य कारवाही करून यांना निलंबित करा अशी मागणी लखन इंगळे यांनी केली नगर परिषद आकोट येथे अगोदर सुद्धा लेखी निवेदन देऊन आंदोलना चा इशारा दि.4.8.2022 रोजी दिला होता व दि.16.6.2022 रोजी नागरिकांसह विविध मागण्यासाठी मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता त्या पैकी काही कामे झाली व काही कामे पेंडिंग ठेवण्यात आली वारंवार या बाबत संबंधित अधिकारी यांना भेटलो असतांना सुद्धा त्यावर कोणत्याही प्रकारचे कामे आता परियंत चालु केलेले नाहीत विनाकारण येथील काही जातीवादी राजकारणी लोकांनी व संबंधित अधिकारी यांच्या चुकामुळे कामे रोखली गेली आहेत असा आरोप लखन इंगळे यांनी केला आकोट शहर मधील काही प्रभाग/वार्डा मधील जसे राहुल नगर, इंदीरा नगर येथील नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागीत आहे पाऊस आला की त्यांना 1फुट चिखलातुन जावे लागत आहे राहुल नगर मधील एकूण 27 कामे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत मा.जिल्हाधिकारी अकोला यांनी दि.24.3.2022 रोजी कामाची प्रशासकीय मान्यता दिलेली आहे आता परियंत तरी सुद्धा या मंजुर कामाची वर्क ऑर्डर सुद्धा नगर परिषद यांनी दिली नाही करीता योग्यती चौकशी करून येथील सर्व कामाची वर्क ऑर्डर देऊन कामे तोरीत चालु करा
अन्यथा आम्ही नागरिकांसह पुढे मोठे आंदोलन करू काही अनुचित प्रकार घडल्यास यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असा इशारा लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट यांनी संबंधित अधिकारी यांना दिला सोबत नितीन तेलगोटे विशाल नाथे राजु भोंडे संदिप पोटे नवनीत तेलगोटे प्रतीक तेलगोटे विशाल पडघामोल सुरेश दातीर विजय आग्रे अनिल बोडखे मुन्ना बुंदले ऋषीं शिंगाडे गोपाल वाळके अजय सपकाळ गजानन केदार श्याम बेहरे श्रीकृष्ण माकोडे सुशांत नाठे योगेश दवंडे सुरज ठाकूर संतोष भावे गोपाल बोडखे प्रवीण बेराड मनोज राऊत तेजस बोडखे अक्षय वानखडे विनय पळसपगार अक्षय तेलगोटे युनिश खान गणेश अवंडकर रहिवाशी नागरिक सर्व पुरुष व महिला यांचे नावे व सह्या आहेत

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे