प.स.सभापती , उपसभापतीचा पदग्रहण सोहळा संपन्न
प.स.सभापती , उपसभापतीचा पदग्रहण सोहळा
बार्शिटाकळी पंचायत समितीच्या बहुचर्चित सभापती व उपसभापती यांचा पदग्रहण सोहळा दिनांक 28 ऑक्टोबरला सकाळी पंचायत समीतीमध्ये सभापती व उपसभापती यांच्या दालनात पार पडला.
यावेळी नवनिर्वाचित सभापती सौ. सुनंदा संजय मानतकर यांच्या सह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतीमांना पुष्पहार अर्पण करून संपन्न झाला. या पदग्रहण सोहळ्याला कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रमेश बेटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सतीश गांवडे, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन मानतकार, जि. प. सदस्य गोपाल भटकर, डॉ गणेश बोबडे, बंडु राऊत, राहुल गायकवाड, जावेद खान, तांबारे, शहराध्यक्ष उमेश राऊत, अरविंद काकड उपतालुकाप्रमुख, पिंटु ठाकरे, गणेश काळे, अशोक इंगळे, नितीन इंगळे, प्रदिप खाडे, किशोर घुगे, योगेश लाहोडकर, निखिल ठाकरे, अनिल आंबेकर, शंकरराव आंबेकर, निलेश मानतकार, आत्माराम सरोदे, रमेश ढोरे, महादेव इंगळे, नरेंद्र मते, अनिल काळे, भागवत हातोलकर, भास्कर काळे, यांच्या सह आजी माजी पदाधिकारी, सदस्य व महाविकास आघाडीच्या विचाराला मानणारे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment