गुलाम नबी आजाद महाविद्यालयात स्वच्छता अभियान संपन्न....
गुलाम नबी आजाद महाविद्यालयात स्वच्छता अभियान संपन्न
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी.
बार्शिटाकळी स्थानिक गुलाब नबी आझाद महाविद्यालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत नुकतेच प्राप्त झालेल्या आदेशान्वये, स्वच्छ भारत अभियान राबविण्याचे आदेश प्राप्त झाले. सोबतच राष्ट्रीय सेवा योजना, संत गाडगे बाबा
अमरावती विद्यापीठाच्या सुचनेप्रमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. एकुनच अशा निर्देशाप्रमाणे स्थानिक गुलाम नबी आझाद महाविद्यालय, बार्शीटाकळी परिसर व लगतच्या परिसरामध्ये असलेले वेस्टेज, प्लास्टिक व इतर कचरा जमा करण्यात आले. महाविद्यालयाचे . प्राचार्य डॉ. मधुकरराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत या स्वच्छता अभियानाला सुरवात झाली. सदर अभियानामध्ये महाविद्यालयाचे जवळपास 60 ते 70 स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. यामध्ये मुलींचा समावेश मोठ्या प्रमाणात दिसून आला. महाविद्यालयाच्या परिसरामध्ये व इतर लगतच्या ठिकाणी असलेला कचरा, प्लास्टिक व इतर वेस्टेज मोठ्या प्रमाणात पिशव्यांमध्ये भरून तो दोन ठिकाणी खड्ड्यांमध्ये जमा करण्यात आला. सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व व प्लास्टिक निर्मूलनाचे कार्य किती महत्त्वाचे आहे हे मान्यवरांच्या मदतीने पटवून देण्यात आले. स्वच्छतेचा समंध आरोग्याशी नीगडीत असल्याने आपल्या आजूबाजूला असलेला कुडा कचरा सातत्याने संकलीत करून विल्हेवाट लावणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन करण्यात आले. नंतर लगेचच सकाळी साडेअकरा वाजता स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली. जवळपास अडीच तास कचरा, प्लास्टिक व इतर वेस्टेज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी जमा करून तो खड्ड्यामध्ये टाकण्यात आला. महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही एस उंडाळ तसेच महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही बी कोटंबे यांनी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आयोजित केला. या सर्व वेस्टेज संकलनासाठी हातात झाडू व इतर साहित्याची स्वयंसेवकांनी मदत घेतली. स्वच्छतेचे अभियानामध्ये जवळपास एकवीस ते तेवीस किलो प्लास्टिक व इतर वेस्टेज दोन ठिकाणी जमा करण्यात आले. महाविद्यालयाच्या काही शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या अभियानामध्ये मदत केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रासेयो चे अनेक विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment