विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व जाणून घ्यावे - नंदकुमार राऊत

विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व जाणून घ्यावे - नंदकुमार राऊत
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
     स्थानिक बार्शीटाकळी प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना द्वारा संचालित गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी येथे प्रा अरुण उमाळे ग्रंथपाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती ग्रंथालयाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंचकावर प्रमुख उपस्थितीत प्रा अरुण उमाळे ग्रंथपाल, अधीक्षक नंदकुमार राऊत, डॉ. दिपक चौरपगार, प्रा सुधीर राऊत डॉ मोहन बल्लाळ, रवींद्र भटकर, ज्येष्ठ पत्रकार मुफिज खान उपस्थित हे होते कार्यक्रमाची सुरुवात माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी नंदकुमार राऊत यांनी आजचा विद्यार्थी हा पुस्तकापासून दुरावला आहे त्यात ऑनलाईन शिक्षण पद्धतीने मोबाईलचा विद्यार्थी आणि अभ्यास यामध्ये प्रवेश मिळवून दिला आहे परिणामी विद्यार्थ्यांना मोबाईलची मोठी सवय जडल्यामुळे तो वाचनापासून अलिप्त झाला आहे पुढे वाचनाची सवय बंद होईल की काय अशी ही भीती व्यक्त करून वाचनाचे महत्त्व व आवश्यकता हे विशद केले तेव्हा प्रा सुधीर राऊत यांनी डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनपट उपस्थित कार्यक्रमांमध्ये हुबेहूब वर्णन करून सर्वांचे मन जिंकून घेतले तर प्रा अरुण उमाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांमधून शासकीय निर्देशान्वये वाचन प्रेरणा दिवस हा कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांनीही तो मोठ्या प्रमाणात अमलात आणला यासाठी काही विद्यार्थ्यांची टीम तयार करून बारा तास अभ्यास वाचन हा कार्यक्रम घेऊन डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहिली यावेळी डॉ मोहन बल्लाळ यांचेही मनोगत झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ दीपक चौरपगार यांनी केले तर आभार प्रदर्शन गोकुळ भड यांनी केले यामध्ये ग्रंथालयातील कर्मचारी दशरथ जाधव, संजय बुटे ,दत्ता शास्त्री ,जनार्धन उइके तसेच विद्यार्थी यांचा मोठा सहभाग होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण वानखडे, सुप्रिया गवई यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे