जी.एन.ए. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळविले सुवर्णपदक......


जी.एन.ए. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळविले सुवर्णपदक 

बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
        स्थानिक बार्शीटाकळी प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना द्वारा संचालित गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी येथील विद्यार्थ्यांनी नुकताच झालेल्या खंडेलवाल महाविद्यालय येथे आंतरमहाविद्यालयीन तायकांडो स्पर्धेत गुलाम नबी आझाद कला व महाविद्यालय बार्शीटाकळी च्या तीन खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले आणि चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा हस्तगत केली. यामध्ये कुमारी रोहिणी फड कुमारी पूनम काशीद व कुमारी काजल वानखडे यांचा समावेश असुन अमृतसर येथे होणाऱ्या ऑल इंडिया स्पर्धेत तिन्ही खेळाडू लवकरच रवाना होत आहे त्यांची निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मधुकरराव पवार यांनी अभिनंदन करुन शारीरिक शिक्षण संचालक प्रा डॉ तारेश आगाशे व श्री राहुल गजभिये यांनी केलेले उत्तम मार्गदर्शन पाहता यांचेही अभिनंदन केले. प्रथमच पदव्युत्तर समाजशास्त्र विभागाची विद्यार्थीनी कु काजल वानखडे हीने तायकांडो स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्या बद्दल समाजशास्त्र विभागाच्यावतीने डॉ दिपक चौरपगार यांनी सर्वांचेच अभिनंदन करत डॉ तारेश आगाशे यांना शुभेच्छा दिल्यात.यावेळी संपूर्ण प्राध्यापक रुंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही खेळाडूचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे