अ.भा.अंधश्रध्दा निर्मूलन समितीची च्या जिल्हा उपाध्यक्षपदी ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे....

अ.भा.अंधश्रध्दा निर्मूलन समितीची च्या जिल्हा उपाध्यक्षपदी ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे.

  अकोला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नुकतीस हॉटेल नैवेद्यम खडकी अकोला येथे जिल्हा बैठक होऊन त्यामध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी ज्येष्ठ समाजसेवक तथा निर्भय बनो जनआंदोलनाचे संयोजक जिल्हा परिषद नगर खडकी येथील गजानन ओंकारराव हरणे यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली. गजानन हरणे हे गेल्या 25 वर्षापासून सामाजिक तथा अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम जोमाने करीत आहेत. चळवळीचा एक कृतीशील कार्यकर्ता म्हणून ते संपूर्ण अकोल्या जिल्ह्यात सुपरीत आहेत . जिल्ह्यामध्ये बाबा ते बाबा हे अभियान गेला कित्येक वर्षापासून राबवले जातात त्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहाला आहे. तसेच अकोला जिल्ह्यामध्ये अनेक बाबा, देवी अंगात आणणाऱ्या महिलांचा भाडाफोड करण्याकरता त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विचार गावागावात पोहोचवीण्याकरता जाहीर सभा, व्याख्याने व शाळा ,महाविद्यालय मध्ये कार्यक्रम घेऊन त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ जिल्ह्यामध्ये पसरवीण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. तसेच आपल्या वडिलां च्या मृत्यूनंतर तेरवी, गोड जेवण , वर्ष श्राद्ध, पिंडदान, केस देणे, आधी सर्व रितीरिवाजांना दिलाजली देवून , सर्व अंधश्रद्धेला मुठं माती देऊन तेरविचा दिवशी अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या पदाधिकाऱ्यांचे जाहीर व्याख्यानाचे कार्यक्रमाचे आयोजित केला होते . तसेच स्वतःचे लग्न केले तेव्हा सुद्धा सर्व वाईट चाली रीति रीवाजला, मंडप, पत्रिका, कुंडली, भटभडजी कडून तारीख काढणे, एवढेच नव्हे तर चांदणी बुडी मध्ये आदर्श विवाह, लग्न करून एक नवा इतिहास घडवला आहे. तसेच आईच्या मृत्यूनंतर सुद्धा, कोणतीही प्रकारच्या नेहमी चालणार अंधश्रद्धेला तिलांजली देवून कोणतेही प्रकारे तेरवी गोड जेवणाचा पिंडदान आधी सर्व कार्यक्रम न करता, व मृतात्म्याची राख नदीत न टाकता शेतात टाकण्यात आली . वृक्षारोपण करण्याची प्रक्रिया करण्यात आली .त्यानंतर गोरगरीब दिव्यांग यांना जीवनावश्यक वस्तूचे किटचे वाटप व तेरवीच्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजनी मंडळाचा कार्यक्रम व मौन श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाकी सर्वसामान्य जनता करीत असलेल्या सर्व अंधश्रद्धांना तिलांजली देऊन हा ही कार्यक्रम पूर्ण करण्यात आला होता. तसेच वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रम रद्द करून त्याऐवजी सामाजिक कार्यकर्ता मेळावा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना संघर्ष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या सत्काराचे गौरवाचे आयोजन त्या दिवशी करण्यात आले होते. आकोला जिल्ह्याच्या कार्यकारणीचे पुर्नगठन करण्याकरीता आकोला जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांची बैठक अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य संघटक प्रा. हरिभाऊ पाथोडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार ८ आॕक्टोंबर २०२२ रोजी स्थानिक हाॕटेल नैवेद्यम् येथे संपन्न झाली.
    राज्य संघटक प्रा. हरिभाऊ पाथोडे हे ४० अभियानाअंतर्गत राज्यभऱ्यात ४० हजार कार्यक्रम घेण्याचे अभियान राबविणार असून ,आकोला जिल्हा चळवळी पोषक असल्याने आकोल्यातूनच या ४० आभियानाची सुरवात व्हावी, ही अपेक्षा व्यक्त केली. या वेळी मंचावर उपस्थित राज्य प्रवक्ते पुरूषोत्तम आवारे , राज्य कार्याध्यक्ष शरद वानखडे , अशोक घाटे महिला संघटिका संध्या देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ ,तरुण पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. व उपस्थितांना मार्गदर्शन केले. वरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आकोला जिल्हातील जिल्हा , महानगर व सर्व तालुक्याच्या कार्यकारणी घोषीत करण्यात आल्या . यामधे आकोला जिल्हा उपाध्यक्षपदी समाजसेवक गजानन हरणे यांची निवड सर्वांनुमते करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही चळवळ पुढे जिल्ह्यात ताकदीने पुढे नेण्याकरता आपण प्रयत्न करू असे आश्वासन निवडीनंतर गजानन हरणे यांनी दिली आहे. त्यांच्या निवडीबद्दल अनेक सामाजिक संस्था ,संघटना राजकीय पक्षाचे पदाधिकाऱ्याने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. प्र् 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे