सिरत्तूंनाबि निमित्त हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित (सीरत कुविज्) चे जमिअत ए उलमा च्या वतीने आयोजन.
सिरत्तूंनाबि निमित्त हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित (सीरत कुविज्) चे जमिअत ए उलमा च्या वतीने आयोजन.
तालुक्यांत तीन ठिकाणी परीक्षा.
मकतब (मदरसा) चे सुमारे ७०० विद्यार्थी चा समावेश
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी.
स्थानिक जमिअत ए उलमा च्या वतीने सिरत्तूनाबी चे औचित साधून हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित प्रश्नन ची परीक्षा येत्या २३ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असून त्या मध्ये तालुक्यातील सुमारे ७०० विध्यर्थी भाग घेणार असल्याचे जमिअत ए उलमा चे शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान यांनी सांगितले आहे.
सदर परीक्षा ही जमिअत ए उलमा चे तालुका अध्यक्ष व मिनारा मस्जिद चे इमाम व खतीब मौलाना अब्दुल सलाम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार असून या मध्ये सुमारे दोन शे प्रश्न राहणार आहे.
सदर परीक्षा ही मिनारा मस्जिद बार्शिटाकळी, प्लॉट मस्जिद महान, जामा मस्जिद पिंजर या तीन ठिकाणी होणार आहे. याचा टाइम सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार असून आपल्या पाल्यांना वेळे वर परीक्षा केंद्रावर जाऊन बसविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सदर परीक्षा व्यवस्थित व वेळेवर योग्य पार पाडावी या साठी मुफ्ती इमदाद, मौलाना अब्दुल सालिम्,मुफ्ती सय्यद शाकीर,मौलवी असलम,मुफ्ती जुबेर,मौलवी शोएब,हाफीज सलमान,हाफीज असलम आदी अथक परिश्रम घेत आहेत.
Comments
Post a Comment