परतीच्या पावसात नुकसान झालेल्या जिल्ह्याच्या यादीतुन अकोला जिल्हा वगळण्यात आला असल्याने तो समाविष्ट करण्यात यावा वंचित बहुजन आघाडीची मागणी...
परतीच्या पावसात नुकसान झालेल्या जिल्ह्याच्या यादीतुन अकोला जिल्हा वगळण्यात आला असल्याने तो समाविष्ट करण्यात यावा वंचित बहुजन आघाडीची मागणी...
अकोला
जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांना वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.महाराष्ट्र राज्यात परतीच्या प्रवासाने नुकसान झालेल्या २५ जिल्ह्याच्या यादीतुन अकोला जिल्हा वगळण्यात आला आहे. वास्तविक अनेक जिल्ह्यांत एखाद्या मंडळाला परतीच्या प्रवासाने नुकसान केले असले तरी आपण त्या जिल्ह्यात नुकसानीचा सर्वे करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु संपूर्ण अकोला जिल्ह्याला परतीच्या पावसाने अक्षरशः हाहाकार करून सोडला असतांना तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा व पातुर भागात ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले असतांना परतीच्या प्रवासाने नुकसान झालेल्या जिल्ह्याच्या यादीतुन अकोला जिल्हा वगळण्यात आला आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील नुकसान पाहता सदर जिल्ह्याला नुकसानग्रस्त जाहिर करून तात्काळ नुकसानाचा सर्वे करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी.
करीता वरिल निवेदन आपणास सादर करत आहे. आपण अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व घरांची पडझड झालेल्यांना योग्य न्याय द्यावा अन्यथा वंचित बहुजन आघाडी तिव्र आंदोलन करेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद देंडवे यांनी दिला या निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे, विभागीय महासचिव बालमुकुंद भिरड, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, जिल्हा महासचिव निलोफर शहा, प्रतिभाताई अवचार, दिनकरराव खंडारे, गजानन गवई, किशोर जामणिक, देवराव राणे, शरद इंगोले, मंगला शिरसाट, विकास सदांशिव, गोपाल कोल्हे, संजय नाईक, पवन बुटे, पराग गवई, सै. सादिक भाई, मोहन तायडे, सुमेध अंभोरे, राजकुमार क्षिरसागर, संजय किर्तक, हरिष रामचवरे, श्रीकृष्ण देवकुणबी, सुरेंद्र तेलगोटे धाया तायडे, मंदाताई वाकोडे, सुरेखा सावदेकर, तेजस्विनी बागडे, सै. करिम उर्फ जानी, धर्मेंद्र दंदी, जनार्दन तायडे, सुरज तायडे, आनंद खंडारे, मधुकर गोपनारायण, देवानंद तायडे, सचेंद्र तिडके, रूपेश जंजाळ, वासिम काजी, सतिश निमकर, तमीज खॉं, सैय्यद रियासत, रत्नपाल डोंगरे, सिध्दार्थ शिरसाट, सुनिल शिरसाठ, श्रावण रामदास भातखडे, नईमोद्दीन शेख, इमरान खान, अझहर पठाण, शेख अफरोज, सुरेश जामणिक, अनिल धुरंधर, नागेश सुलताने, दिलीप शिरसाट, अमोल शिरसाट, सचिन शिरसाट, अतिश शिरसाट आदि कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment