वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी येथील फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या व्यवसायीकाना पतधोरणात सहभागी करण्यासाठी न.प. परीसरातील व्यवसायीकाना शासन निर्णय 2014 नुसार फेरीवाला धोरण लागु आहे त्यामुळे बार्शिटाकळी मधील फेरीवाले व्यवसायीकाची जणगणना अजुन पर्यंत वंचित होते त्याची दखल म्हणून वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश जी विश्वकर्मा व प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, तसेच बार्शिटाकळी येथील वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने नगरपंचायत ला निवेदन दिले होते त्या निवेदनाची नगरपंचायत ने दखल घेत आज दिनांक 12 आक्टोबंर रोजी फेरीवाले यांची जणगणना करण्यासाठी अकोला येथील विनोद सिरसाठ ,आकाश ईगळे, पियुश गवई हे बार्शिटाकळी येथील व्यवसायीकांची जणगणना करत असुन त्यांच्या सोबत वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनिक, रूग्ण कल्याण समिती सदस्य ईमरान खान, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, रक्षक जाधव, उमेश गवई, सनी धुरंधर, नगरपंचायत चे कर्मचारी युशुफ अली हे हजर राहून काम करत आहेत तसेच फेरीवाले सर्व दुकानदार यांनी आपले आधार कार्ड लींक केलेली झेरॉक्स व राशन कार्डाची झेरॉक्स आपल्या जवळ ठेवावी फेरीवाले आपल्या दुकानाची जणगणना करण्यासाठी आल्यास त्यांना त्या झेरॉक्स देऊन आपल्या दुकानाची नोंद करावी असे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनिक यांनी सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे