वऱ्हाडी कट्टा फेसबुक समूहाचा सहावा स्नेहमिलन सोहळा यावर्षी अकोल्यात........
वऱ्हाडी कट्टा फेसबुक समूहाचा सहावा स्नेहमिलन सोहळा यावर्षी अकोल्यात----
वऱ्हाडी कट्टा फेसबुक समूहाचे साहित्य संमेलन तथा स्नेहमिलन सोहळा दि.३०/१०/२०२२ रोजी स्व.अण्णासाहेब रोकडे मिलन सभागृह अकोला नगरीत पार पडणार आहे..
या सोहळ्याला संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक नरेंद्र इंगळे, उदघाटक श्री किशोर बळी सर,माजी अध्यक्ष अँड अनंत खेळकर, स्वागताध्यक्ष रजनीताई बावस्कर, प्रमुख अतिथी श्री पुरुषोत्तम आवारे पाटील राहाणार आहेत.
सम्मेलनात जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ साहित्यिक श्री तुळशिराम मापारी यांना, स्व उज्ज्वल विभूते वऱ्हाडी कट्टा साहित्य गौरव पुरस्कार श्री अरविंद शिंगाडे यांना, वऱ्हाडी कट्टा काव्य गौरव पुरस्कार सौ मधुराणी बन्सोड यांना, वऱ्हाडी कट्टा गझल गौरव पुरस्कार गझलकार अरविंद उन्हाळे यांना तर
स्व.विनोद बाबू अग्रवाल अकोटीया पुरस्कार प्रसिद्ध कवी वैभव भिवरकर यांना देण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाची सुरूवात ही उद्घाटन सोहळा आणि पुरस्कार वितरणाने सुरू होणार आहे..
सकाळी सकाळी १० ते १२:३० उद्घाटन सोहळा आणि पुरस्कार वितरण... १२:३० ते २ पर्यंत स्नेहभोजन... दुपारी २ ते ३ ज्येष्ठ कथाकार आणि साहित्यिक श्री विजयभाऊ इंगळे ( चितलवाडी जि.अकोला यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होणार आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमोल गोंडचवर हे करणार आहेत..
दुपारी ३ ते ५ या वेळेत एक बहारदार काव्य मैफिल ज्येष्ठ साहित्यिक श्री सुरेशजी नागले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली आहे... या काव्यमैफिलीचे सूत्रसंचालन हे प्रसिद्ध कवि प्रा.देवबाबू लुले तसेच प्रसिद्ध गझलकार गोपाल मापारी करणार आहेत...
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण स्तंभलेखकांचा सत्कार, तसेच व-हाडी कट्टयातील सदस्यांच्या मुलामुलींचे ( विशेष प्राविण्य प्राप्त) विशेष सत्कार करण्यात येतील. भेटीगाठी स्नेहभोजन, तसेच महिला साहित्यिक, महिला मंडळीचे हळदी कुंक होणार आहे.
व-हाडी कट्टा अॕडमीन श्री नितिन वानखडे, लक्ष्मण दारमोडे, राजेश गिरे, उज्वलाताई कांबळे, डाॕ.लक्ष्मण उगले , डाॕ.शशिकांत पाथ्रीकर,राम पळसकार , कुशल राऊत आणि संपूर्ण व-हाडी कट्टा सदस्य या कार्यक्रमाचे आयोजन करतात..
सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील व-हाडी कट्टयातील सदस्य आणि साहित्यिक मंडळी उपस्थित राहणार आहेत...
Comments
Post a Comment