विझोरा - कुंभारी रस्त्याचे काम थांबविले ! खड्डे न भरता माघारी : प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी
विझोरा - कुंभारी रस्त्याचे काम थांबविले !
खड्डे न भरता माघारी : प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी
बार्शिटाकळी : सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोला क्रमांक १ अंतर्गत विझोरा- साखर कारखाना कुंभारी रस्त्याचे काम झाले परंतु तीन महिन्यातच रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे हे खड्डे भरण्याचे काम सुद्धा निष्कृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत शनिवार 29 सप्टेंबर रोजी गावकऱ्यांनी काम बंद पाडले.
विझोरा कुंभारी रस्त्याचे नियोजन महिन्यात मजबुतीकरण डांबरीकरण करण्यात आले होते परंतु डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता अल्पावधीतच उघडला या रस्त्यावर घडले पडले आहेत दरम्यान खड्डे व त्याचेच भरण्याचे काम शुक्रवारपासून करतात कत्राटटदारांनी सुरू केले होते ते सुद्धा काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी काम थांबविले. या कामाचे अभियंता स्वतः कामावर हजर राहत नाहीत, तोपर्यंत काम बंद करण्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता. अखेर अभियंता घोडस्कर यांनी कंत्राटदाराला काम बंद करण्याचे सांगितले.
" विझोरा - साखर कारखाना कुंभारी रस्त्याबाबत ९ जुन रोजी लेखी तक्रार केली होती. परंतु याबाबत अधिका-यानी दुर्लक्ष केले. त्यामुळे कंत्राटदारांकडून पुन्हा निकृष्ट दर्जाचे काम होत आहे, ;
उमेश गवई
ग्राम पंचायत सदस्य विझोरा
" विझोरा रस्त्याचे पॅचेस भरण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे समजले. याबाबत कंत्राटदारांना काम बंद करण्याचे सांगितले. ;
-पवन घोडेस्वार, शाखा अभियंता
सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोला
" विझोरा कुंभारी रस्त्याचे काम करतेवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दर्जाच्या कामाबाबत वारंवार अवगत केले परंतु याबाबत दाखल घेतली नाही त्यामुळे रस्त्याचा समर्थांच्या समोर आला ;
त्र्यंबक गवई माजी उपसरपंच विझोरा ;
Comments
Post a Comment