वंचितच्या वतीने निंभोरा येथील मनोज ओवे यांच्या कुटुंबीयांचे केले सात्वन......
वंचितच्या वतीने निंभोरा येथील मनोज ओवे यांच्या कुटुंबीयांचे केले सात्वन......
अकोला : अकोला तालुक्यातील निंभोरा येथील ३३ वर्षीय मनोज ओवे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने झोपेतच निधन झाले होते. मृतक मनोज ओवे हा अत्यंत मनमिळाऊ व कष्टाळू तरुण म्हणून परिसरातील सर्व गावागावात परिचित होता. वंचित बहुजन आघाडीचा युवा कार्यकर्ता म्हणून तो सतत पक्षाच्या आंदोलनात व कार्यक्रमात उपस्थित रहायचा. त्याचे निधन झाल्याची वार्ता हि परिसरात हवेसारखी पसरली त्यामुळे हि दुखद वार्ता माहित होताच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे, अकोला पुर्व तालुकाध्यक्ष किशोरभाऊ जामनिक, अकोला पश्चिम तालुकाध्यक्ष देवरावजी राणे, अकोला तालुका महासचिव शरदभाऊ इंगोले, तालुका संघटक शंकरराव राजुस्कर, ता. प्रसिध्दी प्रमुख मोहनभाऊ तायडे आदींनी मृतक मनोज ओवे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सात्वन केले. सोबत मृतकाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ह्यावेळी निंभोरा येथील ग्रामस्थांसह मृतकाचे जेष्ठ बंधु विनोद ओवे, साळु निलेश सदांशिव व कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
Comments
Post a Comment