गुलाब नबी आझाद महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न.....
गुलाब नबी आझाद महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न.....
बार्शीटाकळी: स्थानिक गुलाब नबी आझाद महाविद्यालयात मोठ्या उत्साहाने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना यांचे वतीने या कार्यक्रमाची धुरा सांभाळण्यात आली होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम आर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुष्प अर्पण करून झाली. सोबतच रासेयोच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत गायले. मान्यवरांच्या स्वागतानंतर मार्गदर्शनपर भाषणे झाली. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ आर आर राठोड, सोबतच उपस्थित असलेले डॉ धनराज खिराडे, नेहमीच उपस्थित असलेले व सखोल मार्गदर्शन करणारे डॉ मोहन बल्लाळ, डॉ अमोल श्रीराव, डॉ सोनवणे, डॉ मनीश अहीर, डॉ. शरदचंद्र इढोळे व डॉ जीतुजी राठोड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमामध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त इतिहासातील त्यांचे कार्य मान्यवरांच्या वाणीतून स्पष्ट झाले. डॉ मोहन बल्लाळ यांनी फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. शेतकऱ्यांबद्दल त्यांची असलेली तळमळ, शिक्षणाविषयीचे विचार इत्यादी विषयाला अनुसरून त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ अमोल श्रिराव यांनी सुद्धा फुले यांच्या बद्दल महत्वाचे मुद्दे प्रस्तुत केले. यामध्ये रासेयोच्या अनेक विद्यार्थ्यांचे विचार सुद्धा ऐकायला मिळाले. अध्यक्षीय विस्तारित भाषणामध्ये डॉ आर आर राठोड यांनी फुले यांच्या जीवनावर विचार प्रस्तुत केले. स्त्री शिक्षणा विषयी त्यांची असलेली शीकवन, व त्यांनी केलेली तात्कालीन महत्त्वाची कार्य याबद्दल विचार मांडले. या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्याकरिता रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ व्ही एस उंडाळ व डॉ व्ही बी कोटंबे यांनी अथक परिश्रम घेतले. सोबतच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांनी सुद्धा महत्त्वाचे सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी डॉ एस एस देशमुख व इतर शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रासेयोचे महादेव खंदारे व कु. शिवानी हिने केले.
Comments
Post a Comment