∆एच.आय.व्ही.एड्स व आरोग्याबाबत पथनाट्याव्दारे ११ गावात जनजागृती कार्यक्रम संपन्न..... ∆लोककलावंत सागर राखोंडे व संचानी केले सादरीकरण.....
∆एच.आय.व्ही.एड्स व आरोग्याबाबत पथनाट्याव्दारे ११ गावात जनजागृती कार्यक्रम संपन्न.....
∆लोककलावंत सागर राखोंडे व संचानी केले सादरीकरण.....
बार्शीटाकळी ( बाळकृष्ण उताने पाटिल )
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था,मुंबई अंतर्गत लिंक वर्कर स्कीम जिल्हा अकोला आणि भाग्योदय आरोग्य व बहु. शिक्षण संस्था,अकोला व स्व.विनायक राखोंडे प्रतिष्ठाण,पातुर यांच्या वतीने सन २०२२-२३ वर्षाकरिता अकोला जिल्हातील ११ ग्रामपंचायती मध्ये एच.आय.व्ही एड्स व टी.बी,गुप्तरोग तसेच आरोग्य बाबत माहिती व उपाययोजनेची परिपुर्ण माहिती ही पथनाट्याव्दारे जनजागृती कार्यक्रमातून देण्यात आली. यावेळी युवाश्री विशाल राखोंडे व्दारा लिखित लोककला व पथनाट्य कार्यक्रम स्व.विनायक राखोंडे प्रतिष्ठाण,पातुरचे अध्यक्ष व पथनाट्यकार सागर राखोंडे व त्यांचा नेतृत्वात शाहीर सुखदेव उपर्वट, दिव्यांग कैलास सिरसाट, गजानन आवटे, बाळू देवकर, प्रज्वल भाजीपाले, श्याम उगले, आकाश नेमाडे, सागर पदमने, ज्योती राखोंडे, पल्लवी मांडवगणे यांनी पथनाट्याच्या माध्यमातून एच.आय.व्ही एड्स व क्षयरोग, टी.बी तसेच गुप्तरोगा बाबत माहिती दिली त्यामध्ये नियमित रक्ताची तपासणी करणे त्याचे लक्षणे, त्यावर उपाय योजना, महिलांना आरोग्य विषयाबाबत मार्गदर्शन तसेच मोफत रक्त तपासणी व लिंक वर्कर स्कीमच्या व आरोग्य विषयक आणि शासकीय योजनांची माहिती लोककला व पथनाट्याव्दारे देण्यात आली.
यावेळी या कार्यक्रमाचे आयोजन भाग्योदय संस्थेचे अध्यक्ष बळीराम रामटेके व जिल्हा साधन व्यक्ती सुरजसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व नियोजन करून करण्यात आले. यावेळी सुपरव्हायझर गजानन राऊत गावातील लिंक वर्कर बाळकृष्ण उताने , प्रशांत कुटे, सचिन इंगळे, महेंद्र वानखडे यांनी व गावाचे सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, महिला बचत गट व पत्रकार यांनी उपस्थित राहून सहकार्य केले व गावातील नागरिकांनी व महिलांनी तसेच युवांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहुन सदर कार्यक्रमाचा लाभ घेतला.
Comments
Post a Comment