∆युवकांनी रोहीच्या पिल्लाला दिले जीवनदान.... ∆सकाळी फिरायला जाण्याऱ्या युवकांचे प्रेरणादायी कार्य.... ∆पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे उपचारास विलंब... ∆प्रथमोपचार करून ,जखमी पिल्लू ,धाबा येथील वनरक्षकाच्या ताब्यात दिले....

∆युवकांनी रोहीच्या पिल्लाला दिले जीवनदान....

∆सकाळी फिरायला जाण्याऱ्या युवकांचे प्रेरणादायी कार्य.... 

∆पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे उपचारास विलंब...

∆प्रथमोपचार करून ,जखमी पिल्लू ,धाबा येथील वनरक्षकाच्या ताब्यात दिले....
बार्शीटाकळी : बार्शीटाकळी शहरातील काही प्रतिष्ठित व्यक्ती नित्यनेमाने, भल्या पहाटे फिरायला जात असतात. ते आजही फिरायला गेले आणि घरी परत येत असतांना, सकाळी अंदाजे ६:३० वाजता ,त्यांना एक रोहीचे एक पिल्लू एका कुत्र्याच्या तावडीत सापडल्याचे दिसले. ते पिल्लू जीवाच्या आकांताने ओरडत होते. ते पाहून हे सर्व युवक त्या रोहीच्या पिल्लाला वाचवण्यासाठी धावले.त्यांनी त्या पिल्लाची सुखरूप सुटका केली परंतु ,त्या कुत्र्याने चावा घेतल्याने व त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपडत करतांना, त्याला शेतकुंपणाच्या तारांनी रक्तबंबाळ केले. त्या सर्वांनी ,जखमी अवस्थेत असलेल्या रोहीच्या पिल्लाला ,बार्शीटाकळी येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयात आणले. सकाळची वेळ असल्यामुळे ,तेथे कार्यरत पशुवैद्यकीय अधिकारी व ईतर कर्मचारी उपस्थित नव्हते म्हणून पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी ही बाब वनखात्याच्या अखत्यारीत येते म्हणून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्या युवकांनी दैनिक देशोन्नतीच्या तालुका प्रतिनिधीशी संपर्क साधला. आमच्या तालुका प्रतिनिधीने याबाबतीत पशुवैद्यकीय अधिकारी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी ,तेच उत्तर दिले की हे वनखात्याच्या अखत्यारीत येते .. त्यांचे पत्र मिळाल्यावरच पुढील उपचार सुरु करता येइल. कायद्याच्या दृष्टिकोनातुन पशुवैद्यकीय अधिकारी जरी बरोबर असतील तरी त्यांनी एका मुक्या जीवावर उपचार करावे असे त्या सर्व युवकांना वाटणे साहजिकच आहे.परंतु परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता ,नियमावर बोट ठेवणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी यांनी ,नियमांनुसार मुख्यालयी सुद्धा रहावे .. पण नियम फक्तं आपल्या सोईसाठीच वापरायचे ,असा हेतू बहुतांश सरकारी कर्मचाऱ्यांचा असतो असे जाणवते.या सर्व गोष्टीवर वरिष्ठांनी लक्ष द्यायला पाहिजे परंतु वरिष्ठ सुद्धा मुख्यालयी राहत नाहीत.. सकाळी साडे सहापासुन पशुवैद्यकीय अधिकारी यांची उपचारांसाठी वाट पाहत असतांना ,पशुवैद्यकीय अधिकारी ८.४५: ते ९:०० च्या दरम्यान पोचल्या. त्यांनी प्रथमोपचार केल्यावर ते जखमी रोहीचे पिल्लू धाबा येथील वनरक्षक करवते यांच्याकडे सुपूर्द केले. हे सर्व होईपर्यंत ते मानवतेला सर्वस्व मानणारे युवक तेथेच उपस्थित होते. अशा माणुसकीच्या कार्यात, सतत हिरीरीने भाग घेणाऱ्या युवकांना असा अनुभव सतत येत राहीला तर चांगल्या कामात कोणी पुढे येणार नाही अशी खंत त्या युवकांनी बोलून दाखवली.याबाबतची बातमी वृतपत्रातुन छापु नका ,संपादक माझ्या ओळखीचे आहेत ,तुम्ही बातमी छापली तर मी मग माझी ताकद दाखवते अशा प्रकारचे वक्तव्य संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दैनिक देशोन्नतीच्या तालुका प्रतिनिधीला बोलतांना केले . आणि विशेष म्हणजे त्या रोहीच्या पिल्लाला जीवनदान देणाऱ्या युवकासमोर .. ते सर्व या गोष्टीचे साक्षीदार आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधीची अशी गळचेपी होत असेल तर आम्ही उपेक्षितांचे प्रश्न शासन दरबारी कसे मांडायचे ? असा सुर बार्शीटाकळी तालुका पत्रकार संघाच्या सदस्यामध्ये उमटत आहे.


∆येथे राहण्याची सोय नसल्यामुळे मी अकोला येथील खडकी येथून अपडाऊन करते. व खडकी हे ठिकाण मुख्यालयाच्या नियमानुसार आहे. कारण खडकी ते बार्शीटाकळी केवळ ७ किलोमीटर अंतर आहे.
डॉ.स्नेहलता पाटील 
पशुवैद्यकीय अधिकारी
बार्शीटाकळी

∆आम्ही वारंवार पशुवैद्यकीय अधिकारी यांना त्या जखमी रोहीच्या पिल्लावर उपचार करण्यासाठी बोलत असतांना, त्यांनी नियमाचा पाढा वाचला .. अधिकारी असे वागत असतील तर यापुढे आम्ही अशा कामात लक्ष द्यायचे की नाही ? तसेच देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी आमच्या एका कॉलवर सकाळी थंडीतच पशुवैद्यकीय चिकित्सालयात पोचले. परंतु त्यांना देखील पाहून घेण्याची भाषा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी वापरली.हे बिलकुल योग्य वाटले नाही.
अनंत केदारे
सुरेश कव्हळकर 

∆ त्या जखमी रोहीच्या पिल्लाला जीवनदान देणाऱ्यात रमेश देशमुख,सुरेश कव्हळकर ,राजू राऊत,अनंत केदारे ,शिवानंद खोडके ,दिनकर काळे ,दत्ता साबळे ,संजय चव्हाण,मंगेश ढोरे ,उमेश राऊत यांचा समावेश होता.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे