अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी यांचा सत्कार
*अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी यांचा सत्कार*
प्रतिनिधी बार्शीटाकळी
अकोला जिल्हा परिषदेने उत्कृष्टपणे राबविलेली मोहीम दिव्यांग सर्वेक्षण या नाविन्यपूर्ण उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर नोंद घेण्यात आली असून या करिता जिल्हा परिषद अकोला ची राष्ट्रीय पुरस्कार करीता निवड करण्यात आलेली आहे. या बद्दल अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना अकोला जिल्ह्याच्या पदाधिकारी यांच्या वतीने आज अकोला जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तीन डिसेंम्बर रोजी भारताच्या महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते हा पुरस्कार मा. सौरभ कटियार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना प्रदान करण्यात येणार आहे. ही बाब अकोला जिल्हाच नाही तर संपुर्ण महाराष्ट्रा करीता अभिमानाची बाब आहे.या उत्सव क्षणी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार साहेब यांचा अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना चे जिल्हाध्यक्ष अनिसोद्दीन कुतबोद्दीन जिल्हा कार्य अध्यक्ष शाहिद इक़बाल खान यांनी या वेळी सहेबांचे शाल व पुष्प गुच्छ देवून अभिनंदन केले
तसेच या वेळी राहुल्लह खान , नावेद अंजुम , इमरान अली , अशफाक सर , जुबेर सर , रियाजोद्दीन , नदीम खान , तस्लीम खान , आदि उपस्थित होते या वेळी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राहुल्लाह खान यानी केले,
Comments
Post a Comment