∆दुहेरी हत्याकांडातील ६ आरोपींना पोलिस कोठडी....∆एक विधी संघर्ष बालक बालसुधारगृहात.....
∆दुहेरी हत्याकांडातील ६ आरोपींना पोलिस कोठडी....
∆एक विधी संघर्ष बालक बालसुधारगृहात.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी : दुधलम गावात घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना बार्शिटाकळी न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे .
पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दुधलम या गावात पीडित कुटुंबामध्ये 2020 साली झालेल्या जुन्या घरगुती आपसे वादातून बाप लेकाचे धारदार हत्यारांनी हत्या करण्यात आली तर दोन महिला सुद्धा जखमी झालेली घटना २३ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडल्याने एकच खळबळ झाली आहे जुने आपसी भांडणाची केस आपसात घेण्याबाबत वारंवार सांगण्यात येत असल्याचा राग मनात घेऊन , प्रताप विठ्ठल पंडित ५२ व सुरज प्रताप पंडित २६ रा. दुधलम या दोघा बाप -लेकाची हत्या करण्यात आली.
या घटनेची माहिती पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजयकुमार वाढवे आणि पीएसआय मेश्राम यांना मिळतात त्यांनी त्वरित घटनास्थळ गाठून वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली असता अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत , गुन्हे अन्वेषण विभागाचे संतोष महल्ले, अकोट पोलिस स्टेशनच्या खोकर मॅडम, मुर्तीजापर शहरचे ठाणेदार, बार्शिटाकळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार संजय सोळंके व फॉरेन्सिक लॅबचे पथक सुद्धा घटनास्थळी हजर झाले होते या घटनेमध्ये एकूण सहा आरोपीवर पुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये किशोर पंडित , चंदा किशोर पंडित , रोशन किशोर पंडित , बंडू जगन्नाथ पंडित , निर्मला जगन्नाथ पंडित , व एका विधी संघर्ष ग्रस्त बालकास गावातून ताब्यात घेण्यात आले त्यातील सहा आरोपींविरुद्ध कलम 302 307 324 323 294 147 148 149 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये एक विधी संघर्ष ग्रस्त बालक असल्याने त्याला पाल सुधार गृह ठेवण्यात आले आहे जखमीला जवळच्याच मुर्तिजापूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजयकुमार वाढवे हे करत आहेत
Comments
Post a Comment