बाळापूर तालुक्यातील ओबीसी महिलांचा वंचितमधे जाहिर प्रवेश...
बाळापूर तालुक्यातील ओबीसी महिलांचा वंचितमधे जाहिर प्रवेश...
बाळापुर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. बाळासाहेब आंबेडकर व आद. अंजलीताई आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत बाळापुर तालुक्यातील २५ ओबीसी महिलांनी पक्ष जिल्हा कार्यालय टावर चौक अकोला येथे जाहिर प्रवेश केला. या जाहिर प्रवेशाच्या वेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ संगीताताई अढावू, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनिल फाटकर, बाळापूर तालुका महासचिव चंद्रकांत पाटील, अकोला तालुकाध्यक्ष किशोर जामनिक, बाळापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय वाकोडे, जेष्ठ नेते अवचितराव वानखडे, शंकरराव राजुस्कर, मोहनभाऊ तायडे, देवानंद तायडे, शावकार डोंगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. ह्या ओबीसी महिलांच्या प्रवेशाने बाळापूर तालुक्यासह जिल्हाभरातील ओबीसी कार्यकर्ते यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले असुन पक्ष मजबूत करण्यासाठी संपूर्ण जिल्हा पिंजून काढणार असल्याचे ह्या ओबीसी महिलांनी हमी दिली.
Comments
Post a Comment