∆-अकोट रेल्वे स्टेशन येथे ये जा करण्यासाठी अंडर ब्रिज आणि ओव्हर ब्रिज सुरु करण्याकरिता रेल्वे प्रशासनाला निवेदन............ ∆-वंचितच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन........... ∆-डी आर एम उपेंद्र सिंग यांनी केली पाहणी..........
∆-अकोट रेल्वे स्टेशन येथे ये जा करण्यासाठी अंडर ब्रिज आणि ओव्हर ब्रिज सुरु करण्याकरिता रेल्वे प्रशासनाला निवेदन....
∆-वंचितच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन...
∆-डी आर एम उपेंद्र सिंग यांनी केली पाहणी....
अकोट . 15 नोव्हे 2022
अकोट : स्थानिक अकोट रेल्वे स्टेशन नजीक असणाऱ्या देशमुख प्लॉट जेतवन नगर येथील लोकांना ये जा करण्यासाठी रेल्वे क्रॉसिंग रोड अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अकोला अकोट रेल्वे प्रशासनाच्या वतीने एका महिन्यामध्ये दोनदा सर्वे केल्यामुळे रेल्वे सुरु होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परंतु प्रभाग 9 अंतर्गत येणाऱ्या रेल्वे परिसरालगतच असलेल्या नागरिकांसाठी रेल्वेचे कार्य सुरु असल्यामुळे येणे जाणे करण्यासाठी समस्या येत आहेत. ह्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माजी नगरसेविका मंदा दिनेश घोडेस्वार आणि बहुसंख्य नागरिकांच्या वतीने आज निवेदन देण्यात आले . ह्या संदर्भात नगरसेविका मंदा दिनेश घोडेस्वार यांनी नागरिकांच्या वतीने आधी केलेल्या पाठपुराव्यामुळे जेतवन नगरमधील अंतर्गत रस्ते पूर्ण झाले आहेत तर अद्यापही उर्वरित अंतर्गत रस्ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत . याआधी नगरसेवक घोडेस्वार यांनी स्थानिक नागरिकांच्या वतीने दिलेल्या निवेदनामुळे रेल्वे प्रशासनाच्या द्वारे रेल्वे ओव्हर ब्रिज तयार केलेला आहे . परंतु रेल्वे अंडर ब्रिज आणि रेल्वे ओव्हर ब्रिज चे काम लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. स्थानिक नागरिकांना कायमस्वरूपी ये जा करण्यासाठी हे ब्रिज व उर्वरित काम लवकर पूर्ण करावे ह्याकरिता डी.आर.एम. उपेंद्र सिंग यांना निवेदन देऊन रखडलेले काम सुरु करावे अशी विंनंती करण्यात आली . ह्याप्रसंगी वंचितचे दिनेश घोडेस्वार, सिद्धार्थ ढगे , नितीन वाघ, विशाल आग्रे , जम्मू पटेल, तस्लीम मिर्जा , अक्षय तेलगोटे , राजू दवणे , वैभव बलखंडे सुभाष इंगोले , मिलिंद निखाते , जयकुमार ठोके , साहेबराव तेलगोटे , उमेश तेलगोटे तसेच बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती लाभली .
.....................................……............................
Comments
Post a Comment