बाबासाहेब धाबेकर विद्यालयात सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन...
बाबासाहेब धाबेकर विद्यालयात सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन...
बार्शिटाकळी : स्थानिक बाबासाहेब धाबेकर बार्शीटाकळी येते सायबर क्राईम बाबत कार्यशाळा पार पडली यामध्ये सायबर म्हणजे काय ? सायबर क्राईम कशाप्रकारे घडतात वाढत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूक कशी होते मोबाईल मध्ये येणारे नवीन ॲप्सद्वारे डेटा कशाप्रकारे चोरी केल्या जातो आणि त्याद्वारे कशी फसवणूक होते व्हाट्सअप , फेसबुक अकाउंट , हॅक कसे केल्या जातात फेक वेबसाइट्स कशा ओळखाव्या एटीएम पासवर्ड , ओटीपी , याबाबत अकोला येथील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या आदित्य बोडखे आणि वैष्णवी बेलंगे यांनी विद्यार्थ्यांना उपयोगी आणि उत्कृष्ट मार्गदर्शन केले अशा ऑनलाइन फसवणुकीपासून कसे दूर राहावे कोणती काळजी घ्यावी सायबर सुरक्षा याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
हा उपक्रम क्विक हिल फाउंडेशन पुणे आणि महाराष्ट्र सायबर सेल मुंबई यांच्या सहयोगाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जगदीश साबू आणि भौतिकशास्त्र विभागाचे डॉक्टर हरिदास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गजेंद्र काळे सर यांनी स्वतःचे प्रेरणादायी अनुभव कथन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी पर्यवेक्षक विलास ताटे सर, सहायक अध्यापक अनिस खान , सहाय्यक शिक्षक गजानन जाधव व शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment