आयुष्यमान भारत कार्डचा फ्री कॅम्प यशस्वी संपन्न......
आयुष्यमान भारत कार्डचा फ्री कॅम्प यशस्वी संपन्न....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी : शुक्रवारी बार्शीटाकळी येथील सामाजिक कार्यकर्ता मो. रिझवान ऊर्फ बाबा यांनी बार्शीटाकळी शहरा मध्ये जामा मस्जिद चौकात आयुष्यमान भारत कार्ड फ्री कॅम्प चे आयोजन केले होते... सदर कार्यक्रमाचे उद्घाटन बार्शीटाकळी चे तहसीलदार मा. गजानन हामद यांनी केले, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न.प.बार्शिटाकळीचे नगराध्यक्ष हाजी महेफुजखान , प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी श्री. दिपक इंगोले, विषेश उपस्थिती म्हणुन न प बार्शीटाकळी चे आरोग्य सभापती सुनिल विठ्ठलराव शिरसाठ आणि नगरसेवक नसीमखान मास्टर, सामाजिक कार्यकर्ता प्रकाश खाडे, हाजी मोहम्मद रफिक होटल वाले हे हजर होते.
सदर मा. तहसीलदार तसेच नगराध्यक्ष आणि आरोग्य सभापती यांनी आयुष्यमान भारत कार्ड विषयी बार्शीटाकळी शहरातील उपस्थित नागरीक यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.........मास्टर राजू कुरैशी
यांनी केले आणि आभार रिझवान सर यांनी मानले.
आज शहरातील २०० ते २५० नागरीकांनी आयुष्यमान भारत कार्ड ची नोंदणी केली. सदर सामाजिक कार्यकर्ता मो. रिझवान ऊर्फ बाबा यांनी सांगितले की, सदर कार्ड हा नेहमी कामा पडेल व प्रत्येक व्यक्ती ने आपल्या मुला बाळंसह हे कार्ड काढणे जरुरी चे आहे. बार्शीटाकळी शहरातील नागरीकांनी जास्तीत जास्त नोंदणी करुन घेतली व
मो. रिझवान ऊर्फ बाबा यांनी वरील कॅम्प ठेवल्यामुळे अनेक नागरीकांनी त्यांचे कौतुक केले.
Comments
Post a Comment