∆जय जवान जय किसान संस्थे' मार्फत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि मोफत पुस्तके वितरण..... ∆जय जवान जय किसान सेवाभावी संस्था पेडगाव मार्फत मोफत स्पर्धा पुस्तकांचे वितरण करण्यात आले.......
∆जय जवान जय किसान संस्थे' मार्फत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि मोफत पुस्तके वितरण.....
∆जय जवान जय किसान सेवाभावी संस्था पेडगाव मार्फत मोफत स्पर्धा पुस्तकांचे वितरण करण्यात आले.......
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी : रेडवा येथे संविधान दिनानिमित्त जय जवान जय किसान या संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रविणकुमार राठोड(सहाय्यक प्राध्यापक, जि.एन.ए.कॉलेज, बार्शीटाकळी ) याने रेडवा येथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करण्यात आले.डॉ. राठोड यांनी स्पर्धा परीक्षेचे अभ्यास कसे करावे, वेळेचे नियोजन, विविध परीक्षा,आभासाच्या विविध पद्धती आणि तंत्र,या विषयी सखोल मार्गदर्शन केले.त्या वेळी पवार मिलिटरी अकॅडमी चे संचालक श्री. मंगेश पवार हे उपस्थित होते. गावातील अनेक विद्यार्थांनी या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात सहभाग घेतला. या प्रसंगी विद्यार्थ्यांना डॉ. प्रविणकुमार राठोड यांनी मोफत स्पर्धा परीक्षा चे पुस्तके वाटप करण्यात आले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आणि सविस्तर मार्गदर्शन केले. लखन राठोड यांनी आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रमांस कु.शालिनी राठोड,कु. निकिता पवार, लखन राठोड, लखन पवार, दर्शन वानखडे, निखिल धुरंदर, तेजस लोंढे, विजय चव्हाण, गौरव वहिले, गोपाल राऊत, अभिषेक पवार, अजित राठोड, शुभम पवार मुरली राठोड, करण राठोड आणि इतर विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment