∆विद्युत प्रवाहामुळे सफाई कर्मचारी जखमी.... ∆नगरपंचायत विद्युत विभागाचा हलगर्जीपणा उघड...
∆विद्युत प्रवाहामुळे सफाई कर्मचारी जखमी....
∆नगरपंचायत विद्युत विभागाचा हलगर्जीपणा उघड...
बार्शी टाकळी : रस्त्याच्या नालीत पडलेला हायमस्ट लाईटच्या वीज वाहक तारेचे स्पर्श झाल्याने नगरपंचायत चा सफाई कर्मचारी जखमी झाल्याची घटना आज १४ डिसेंबरला सकाळी घडली या घटनेमुळे नगरपंचायतच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
बार्शीटाकळी शहरातील रमेश नगर रस्त्याला लागून असलेल्या मिनी हाय मस्त लाईट खांबाच्या वायर मधून विद्युत प्रवाहच्या नालीत प्रवाहित होत आहे बुधवारी नगरपंचायत चे सफाई कर्मचारी नाली साफ करत असतात जानराव खंडारे नामक सफाई कर्मचाऱ्यास विद्युत प्रवाहाचा शॉक लागल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले बार्शीटाकळी येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे हलविण्यात आले या घटनेमुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . या हायमस्ट पोलच्या आजूबाजूला लहान मुले खेळत असतात नगरपंचायतच्या विद्युत विभागाने या ठिकाणच्या केबलची दुरुस्ती करून नाली मध्ये प्रवाहित असलेला विद्युत प्रवाह बंद करावा याविषयी लवकरात लवकर कार्यवाही करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे राष्ट्रवादीचे तालुका महासचिव प्रकाश खाडे यांनी नगराध्यक्षांना एका निवेदनाद्वारे इशारा दिला आहे यावेळी मोहम्मद रिजवान बाबा, शेख मिनाज, दिलुखान , कविदास खाडे , प्रवीण तायडे , रोशन सुरवाडे , ज्ञानेश्वर खाडे , मुकेश सुरवाडे , उदय खाडे , सिद्धार्थ जामनिक, मोटु सुरवाडे जय खाडे हे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment