स्काऊट गाईड जिल्हा मेळावा पूर्वतयारी सभा संपन्न......

स्काऊट गाईड जिल्हा मेळावा पूर्वतयारी सभा संपन्न......


 बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी 
बार्शिटाकळी : भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्था अकोला व शिक्षण विभाग जिल्हा परिषद अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या 33 व्या स्काऊट जिल्हा मेळावा व कब बुलबुल उत्सव पूर्वतयारीच्या निमित्ताने आढावा सभा नुकतीच तालुका क्रीडा संकुल दगडपारवा ता. बार्शीटाकळी येथे संपन्न झाली. जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. वैशाली ठग यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेत जिल्हा आयुक्त (गाईड) तथा शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. सुचिता पाटेकर ,जिल्हा मुख्यालय आयुक्त तथा गटशिक्षणाधिकारी श्री.रतनसिंग पवार , मुख्याध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष प्राचार्य शत्रुघ्न बिरकड, प्राचार्य गजेंद्र काळे इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
सभेचे प्रास्ताविक जिल्हा संघटक(गाईड) श्रीमती मनीषा तराळे यांनी केले.तर आभार प्रदर्शन जिल्हा संघटक (स्काऊट) श्री.महेंद्र वसावे यांनी केले.मुख्याध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य शत्रुघ्न बिरकड यांचा शिक्षणाधिकारी महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 33 वा स्काऊट गाईड जिल्हा मेळावा शाळेचे मुख्याध्यापक राजेश पातळे यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजनखेड तांडा ता. बार्शिटाकळी येथे घेण्याचे निश्चित झाले असून त्यादृष्टीने मेळावास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन जिल्हा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली आहे.जिल्हा मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी दोन्ही शिक्षणाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. याप्रसंगी जिल्हा संस्थेचे पदाधिकारी सर्वश्री.श्रीकृष्ण डांबलकर, पी.जे.राठोड, सुषमा देशमुख, वसंत माळी,दत्तात्रय सोनोने, वसंत ढोकणे, प्रताप वानखडे गुरूजी, बबलू तायडे,सविता शेवतकर, स्मिता डांबलकर, कल्पना शिंदे, पुष्पा गोल्डे, संजय वाघमारे ,पंकज देशमुख,विष्णुदेव इंगळे,कार्यालयीन कर्मचारी संतोष भेंडेकर, विक्रम काळे, सुबोध शेगावकर, नरेंद्र आठवले इत्यादी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे