बार्शिटाकळी येथे राष्ट्रसंतांचा पुण्यतिथी, पुण्यस्मरण महोत्सव संपन्न......
बार्शिटाकळी येथे राष्ट्रसंतांचा पुण्यतिथी, पुण्यस्मरण महोत्सव संपन्न.
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी : मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५४ व्या पुण्यतिथी निमित्त,सर्व संत स्मृती दिन व पुण्यस्मरण, मौन श्रद्धांजली महोत्सव, बार्शिटाकळी येथील श्री खोलेश्वर मंदिर येथे,सोमवार दि.२६ डिसेंबर २०२२ संपन्न झाला. श्री अशोकराव पळसकार व श्री गोपालभाऊ वक्टे यांचे संकल्पनेतून,स्थानिक श्री खोलेश्वर गुरुदेव सेवा भजन मंडळाने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला शहर सेवाधिकारी श्री काशीरामजी लोखंडे हे होते तर प्रमुख मान्यवरांमध्ये ,अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी येथील वांड:मय विभाग प्रमुख श्री भानुदास कराळे,जिल्हा प्रचार प्रमुख डॉ अशोक रत्नपारखी, जिल्हा उप सेवाधिकारी श्री भिमराव गावंडे, श्री खोलेश्वर संस्थान चे अध्यक्ष श्री श्रीराम येळवणकर,श्री भारतभाऊ बोबडे,दत्तात्रय साबळे,संतोष राऊत,प्रकाश माणीकराव,तालुका प्रचार प्रमुख श्री देविदास कावरे, तालुका सरचिटणीस श्री रवीसींग डाबेराव,श्री गजानन जळमकर, यांची उपस्थिती होती. सकाळी अधिष्ठान पुजन, ह. भ.प.अनिरुद्ध क्षीरसागर, त्या नंतर ग्रामगीता अध्याय वाचन, श्री दिपक लुले गुरुजी यांनी केले. सायंकाळी ४.०० ते ६.०० मौन श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण, श्री अरविंद रत्नपारखी गुरुजी व त्यांचे श्री नंदकिशोर शेंडे,संतोष झरकर, अंकुश पळसकार,दयाराम भगत,मोरेश्वर वाघ,राम बोबडे, राजगुरू पवार, गणेश कापकर, विजय चव्हाण, योगेश्वरी हरणे यांनी केले.या संगीतमय कार्यक्रमाचे संचालन कु.कोमल वक्टे हिने केले.सामुदायिक प्रार्थनेवर,राजंदा येथील ह.भ.प श्रीकृष्ण पांडे यांनी चिंतन प्रकट केले.श्री हरिदासजी रत्नपारखी यांनी आपल्या प्रास्ताविक यामध्ये बार्शिटाकळी शहरातील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अविरत कार्याची माहिती तसेच श्री खोलेश्वर संस्थान या पवित्र भुमीला राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन केले आहे. त्या मुळे गेली ४५ ते ५० वर्षापासून हा उत्सव या भुमीमध्ये साजरा होत असल्याचे सांगितले. त्या नंतर श्री भिमराव गावंडे, वर्हाडी साहीत्यिक श्री शाम भाऊ ठक,सुनिताताई ताले,सामाजिक कार्यकर्ते श्री रमेशभाऊ वाटमारे,भाणुदास कराळे,डॉ अशोक रत्नपारखी यांची पुण्यतिथी महत्वावर भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन, ज्येष्ठ साहीत्यिक श्री तुळशीरामजी बोबडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री हरिदास रत्नपारखी यांनी केले. कार्यक्रम स्थळी विनामुल्य ,साऊंड सिस्टम व मंडप व्यवस्था,श्री विनय ठाकूर यांची होती तर व्यासपीठ सजावट,श्री सुरेंद्र राऊत यांची होती.त्या नंतर श्री भास्करराव ग्याने यांचे भजन गायनाने भजन संमेलनाला सुरुवात झाली. या मध्ये श्री जगदंबा गुरुदेव सेवा भजन मंडळ पुनोती खुर्द, श्री दत्तात्रय गुरुदेव सेवा भजन मंडळ दगडपारवा, श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ कान्हेरी सरप, श्री जागेश्वर गुरुदेव सेवा भजन मंडळ आळंदा, श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ डाबकी रोड अकोला या मंडळांनी सहभाग नोदविला.अशी माहिती श्री गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका प्रसिद्धी प्रमुख श्री जेठाभाई पटेल यांनी दिली.
Comments
Post a Comment