धनुर्विद्याभारतीय खेळांमध्ये खेळाडूंनी पुढे यावे..... शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर
धनुर्विद्याभारतीय खेळांमध्ये खेळाडूंनी पुढे यावे..... शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी : धनुर्विद्या हा भारतीय खेळ असून धनुर्विद्येला इतिहास असून ह्या खेळामध्ये आपण मेहनत केल्यास निश्चितच आपला विकास होईल असे उद्गार अकोला जिल्हा शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांनी जिल्हास्तरीय धनुर्विद्या शालेय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी वरील उद्गार काढलेत कार्यक्र माझ्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी भट तर प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ मुख्याध्यापक संघ अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर सहसचिव प्राचार्य गजेंद्र काळे जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष बळीराम झामरे जिल्हा शारीरिक शिक्षण संघटना सचिव गजेंद्र राजेंद्र जलमकर चित्रपट दिग्दर्शक निलेश जलमकर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन संजय मैन प्रास्ताविक प्रणव बहादुरे यांनी केले आपल्या भाषणात प्राचार्य शत्रुघ्न बिडकर यांनी अनिरुद्ध खेळाची माहिती विशद केली प्राचार्य गजेंद्र काळे यांनी द्रोणाचार्यांचे सुंदर उदाहरण दिले सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी यांनी याप्रसंगी धनुर्द्या प्रशिक्षक प्रणव बहादूर यांचा धनुर्विद्या खेळाचा प्रचार प्रसार करितासत्कार केला आपल्या अध्यक्षीय भाषणात जिल्हा क्रीडा अधिकारी भट यांनी धनुर्विद्या करिता विविध योजना जिल्ह्यामध्ये निर्माण करून धनगर विद्या खेळाडूंची कोणतेही अडचण येऊ देणार नाही असे सांगितले क्रमाचे आभार प्रदर्शन राजेंद्र जलमकर यांनी केले स्पर्धेला जिल्ह्यातील धनुरविद्या खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment