सावित्रीबाई फुले विद्यालयात " पास्को ॲक्ट " या विषयी कार्यक्रम संपन्न.....
सावित्रीबाई फुले विद्यालयात " पास्को ॲक्ट " या विषयी कार्यक्रम संपन्न.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी : स्थानीय सावित्रीबाई फुले विद्यालय व ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय बार्शीटाकळी येथे बार्शीटाकळी तालुका विधी सेवा तसेच विधिज्ञ मंडळ बार्शीटाकळी मार्फत शाळेत पॉक्सो ॲक्ट या कायद्या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन विधिज्ञ मंडळ बार्शीटाकळी श्री. ए. बी. कटटे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व श्री. ए. एन. खताडे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ ऍड .शगुफता मॅडम, ऍड. श्री पांडे साहेब होते. मान्यवरांनी पॉक्सोॲक्ट विषयी सविस्तर माहिती दिली
सदर कार्यक्रम शाळेचे प्राचार्य कु.खानझोडे मॅडम यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरित्या पार पाळण्याकरिता महाविद्यालयाचे प्रा.शफीकुर्रहेमान खान ,प्रा.एजाजुर्रहेमान खान, सा. शिक्षक फय्याजउल्ला खान ,अब्दुल फारूक यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला बहुसंख्यात विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते
Comments
Post a Comment