∆किड्स झोन इंग्लिश मेडीयम स्कुल बार्शिटाकळी येथे पालक दिन साजरा..... ∆आजोबा आजी चा सत्कार....

∆किड्स झोन इंग्लिश मेडीयम स्कुल बार्शिटाकळी येथे पालक दिन साजरा..... 
∆आजोबा आजी चा सत्कार....
 
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी 
बार्शिटाकळी :- प्रभात किड्स ची फ्रांचायसी घेऊन तालुक्यातील पहीली नावीन्य पूर्व अभ्यासक्रम सुरु करणारी एकमेव शाळा किड्स झोन इंग्लिश मेडीयम स्कुल येथे विद्यार्थी च्या वतीने पालक दिनाचे औचित्य साधून आजोबा आजी यांना शाळेमध्ये बोलावून पालक दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थी पालक दिनाला शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सर्व प्रथम कार्यक्रमाला शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष महादेवराव भुईभार, शाळेचे संचालक डॉ. गावंडे, सहसंचालक आशालता गावंडे, प्रमुख अतिथी गण श्रावण थोरात,मंगला थोरात, मुख्याध्यापीका प्रियंका गावंडे, योगेश गावंडे,याच्या हस्ते विद्येची आराध्य दैवत माता सरस्वती याच्या प्रतिमेस कुमकुम टिळक लावून, द्विप प्रज्वलन करून पुष्प हार अर्पण करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यपिका यांनी अतिथी गण यांचे पुष्प देऊन स्वागत केले. तर किड्स झोन इंग्लिश मेडीयम स्कुल च्या विद्यार्थीनी पालक दिनाच महत्व या विषयी ड्रामा करून, अतिथी चे स्वागत गीत म्हणून स्वागत केले. तर त्यां दरम्यान शाळेच्या छोट्याश्या चिमुकल्या विद्यार्थीनी डान्स करून सर्वांची मने जिंकली.त्यानंतर आजोबा, आजी यांची प्रशन मंजुषा कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये चार आजी आजोबा चे जोडपे बसविण्यात आले. त्यांना शाळेच्या विद्यार्थी व शिक्षिका च्या वतीने प्रशन विचारण्यात आले. त्यामध्ये सर्वांनी आनंदाने छान उत्तरे दिली. त्यानंतर सर्व आजोबा, आजी, विद्यार्थी याचे अतिथी च्या वतीने पुष्प गुच्छ व गिफ्ट देऊन स्वागत करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रम अध्यक्ष यांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्याळी त्यांनी विद्यार्थी हे खरे देशाचा आधार स्तंभ आहे. त्यांना घडविण्याचे खरे कार्य आजोबा आजी व शिक्षकांन मध्ये आहे.आजोबा आजी चा सन्मान करणारी ही तालुक्यातील एकमेव शाळा आहे असे त्यांनी अध्यक्षीय भाषणा मध्ये आपले शब्द व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैष्णवी ढोरे व प्रतीक्षा भवाने यांनी केले. या कार्यक्रम दरम्यान मुख्याध्यापिका प्रियंका गावंडे, योगेश गावंडे, श्री चौबे सर, वैशाली हिरोळे, जयश्री ढगे, लक्ष्मी बोळे, प्रज्वला माणवीर, पल्लवी कळंब, हर्षा ससाणे, वर्षा चव्हाण, पूजा मराठे, पाटील मॅडम, नीता भवाने, नीता लाडके, वैष्णवी ढोरे, युगरधारा महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर या कार्यक्रमाचे आभार हर्षा ससाने व वर्षा चव्हाण यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी मित्र, आजोबा आजी यांची मोठया प्रमाणात उपस्थिती लाभली.
छाया , पालक दिन निमित्त आजी व आजो बा यांना संत्कार मान्यवर करताना ,

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे