∆पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या ! ∆सकनी शिवारात केले विष प्राशन !
∆पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या !
∆सकनी शिवारात केले विष प्राशन !
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शीटाकळी;- तालुक्यातील साल्पी वाल्पी येथील मूळ रहिवासी ५५ वर्षीय इसमाने पत्नीच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध राशन करून आत्महत्या केल्याची घटना १२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता चे दरम्यान सकणी शिवारात घडली .मारुती नामदेव क्षीरसागर (५५) असे मृतकाचे नाव असून ते सध्या खडकी, अकोला येथे राहत होते. गेल्या काही महिन्यापासून पत्नीसोबत सतत वाद होत असल्याने पत्नी माहेरी भेंडी काजी येथे राहत होती. मृतक मारुती क्षीरसागर हे आज चोहोगाव येथून बहिणीचे घरून निघून गेले. लोहगड ते सकनी रोडने येऊन त्यांनी प्रदीप ज्ञानदेव खाडे यांचे शेताततील स्मारकाचे मागे विषारी औषध प्राशन केले. खाडे हे शेतात आल्यानंतर त्यांना सदर इसम अत्त्यवस्थेत दिसून आला .त्यांनी १०८ ची रुग्णवाहिका बोलावून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. घटनेची माहिती पुनोतीचे पोलीस पाटील गाडगे यांनी बार्शीटाकळी पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृतकाचे जवळ बँक पासबुक व चिठ्ठी आढळून आली. चिठ्ठीमध्ये नमूद असलेल्या मजकुरावरून मृतकाची पत्नी मंदा हिचे अनैतिक संबंध असल्याने क्षीरसागर हे व्यसनाधीन व कर्जबाजारी झाल्याचे चिठ्ठीत नमूद आहे. घटनास्थळ पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात देऊन शवाविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
Comments
Post a Comment