जि एन ए महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बी आर आंबेडकर महापरिनिर्वाण दिन संपन्न......

जि एन ए महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बी आर आंबेडकर महापरिनिर्वाण दिन संपन्न.......
बार्शिटाकळी प्रतिनिधी 
 बार्शीटाकळी: स्थानिक गुलाब नबी आझाद महाविद्यालय, बार्शी टाकळी जिल्हा अकोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम आर पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये मंचावरील उपस्थित असलेले महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य डॉ. आर आर राठोड सोबतच डॉ राऊत, डॉ सोनवणे, डॉ. मनोज जाधव, डॉ. जीतुजी राठोड इत्यादी उपस्थित होते. यावेळ राष्ट्रीय सेवा योजनेच्या अनेक विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे कार्यावर प्रकाश टाकला. आर्थिक विषमता जितकी कमी होईल, तितकी जातीय भेदभावाची दरी कमी होईल, असे डॉ बाबासाहेबांना नेहमीच वाटत होते. जातीवर आधारित समाजव्यवस्था बदलायची, तर त्यासाठी शेतीमध्ये परिवर्तन घडवावं लागेल. शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. शेतकरी आर्थिक समृद्ध झाला तर शेतमजूर आणि शेतीशी निगडित सर्वच घटकाला या आर्थिक सक्षमतेचा फायदा होईल. यासारख्या बाबासाहेबांच्या अनेक विचारांची आज गरज आहे. शिक्षणाविषयी असलेली त्यांची भुमिका व इतर मुद्दे मांडले. डॉ राउत यांनी विचार मांडताना कनिष्ठ जातींना त्यांच्या दयनीय स्थितीचे कारण शिक्षणाचा अभाव हेच आहे याची जाणिव आंबेडकरांनी करून दिली. कनिष्ठ जातींच्या लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी आंबेडकरांनी त्यांना प्रोत्साहन दिले असे मार्गदर्शन केले. पुढे सर्वांचे मार्गदर्शन झाल्यानंतर अध्यक्षिय भाषणामध्ये डॉ राठोड यांनी विचार मांडतांना डॉ आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनासंबधीत 
महत्त्वाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन करण्यासाठी डॉ. व्ही एस उंडाळ व डॉ. व्ही बी कोटंबे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव खंडारे यांनी केले. रासेयो चे असंख्य स्वयंमसेवक यावेळी उपस्थित होते. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे